मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता प्रसाद ओक सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. प्रसाद त्याच्या कामाबाबतची माहिती अनेकदा शेअर करताना दिसतो. पत्नी व कुटुंबियांबरोबरचे फोटोही प्रसाद शेअर करत असतो. मागच्या वर्षी आलेल्या ‘धर्मवीर’ चित्रपटात तो झळकला होता. या चित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने आनंद दिघेंची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारली होती. त्याच्या भूमिकेचं कौतुकही करण्यात आलं होतं. नुकतंच प्रसाद ओकने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारी पोस्ट शेअर केली आहे.
प्रसाद ओक आपल्या कामाबद्दल सोशल मीडियावर कायमच अपडेट देत असतो. त्याने एकनाथ शिंदे यांच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे, “मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे साहेब वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा..!!! ईश्वर आपल्याला निरोगी आणि उदंड आयुष्य देवो हीच प्रार्थना…!!” अशा शब्दात त्याने शुभेच्छा दिल्या आहेत.
Video : “मला सोडून प्रिया त्याच्याबरोबर…” काश्मीरमध्ये उमेश कामतबरोबर नेमकं काय घडलं?
‘धर्मवीर’ चित्रपट स्व. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट होता. अभिनेता दिग्दर्शक प्रसाद ओक याने आनंद दिघेंची भूमिका साकारली तर क्षितिश दातेने सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका साकारली होती. प्रवीण तरडे यांनी लेखन, दिग्दर्शन अशा दोन्ही जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडल्या होत्या. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
प्रसाद ओकने अनेक मालिका व चित्रपटांतून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सध्या तो ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोमध्ये परीक्षक आहे. तो लवकरच दिग्गज अभिनेते निळू फुले यांच्या जीवनावर आधारित बायोपिक प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहे. तो या चित्रपटात दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे.