मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक म्हणून प्रवीण तरडे (Pravin Tarde) यांना ओळखलं जातं. ‘धर्मवीर मुक्कामपोस्ट ठाणे’, ‘सरसेनापती हंबीरराव’ असे त्यांचे एकापाठोपाठ एक सुपरहिट चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांच्या या चित्रपटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. आता प्रवीण यांना त्यांच्या कामामधून निवांत वेळ मिळाला आहे. म्हणूनच ते पत्नी स्नेहल तरडेबरोबर लंडन येथे सुट्टी एण्जॉय करताना दिसत आहे.
आणखी वाचा – “तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण…” अभिनेता रितेश देशमुख स्पष्टच बोलला
प्रवीण यांची पत्नी स्नेहलने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये प्रवीण आणि स्नेहल यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. मराठीमधील हे सेलिब्रिटी जोडपं लंडनच्या रस्त्यावर रोमँटिक डान्स करताना दिसत आहेत. स्नेहने रिल व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर शेअर केला आणि नेटकऱ्यांची याला पसंती मिळाली.
पाहा व्हिडीओ
या व्हिडीओमध्ये प्रवीण यांनी पिवळ्या रंगाचं टी-शर्ट, काळ्या रंगाचं जॅकेट आणि पँट परिधान केलेली दिसत आहे. तर पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये स्नेहल अगदी सुंदर दिसत आहे. प्रवीण तरडे यांचा कधीही न पाहिलेला रोमँटिक अंदाज या व्हिडीओमध्ये दिसत आहे. सध्या प्रवीण-स्नेहल लंडनमध्ये सुट्ट्या एण्जॉय करण्यात मग्न आहेत.
याआधी प्रवीण यांनी लंडनमधील काही व्हिडीओ शेअर केले होते. लंडनमध्ये देखील त्यांनी आपली मराठमोठी संस्कृती जपली आहे. लंडन दौऱ्यादरम्यान प्रवीण तरडे त्यांच्या पत्नीसह मरोठमोळ्या लूकमध्ये नाटक पाहायला पोहोचले. यादरम्यानचा त्यांनी एक व्हिडीओ फेसबुक अकाऊंटद्वारे शेअर केला होता.