महाराष्ट्रामध्ये सध्या विठ्ठू माऊलीवर आधारित विठ्ठल या चित्रपटाची चर्चा रंगली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून मुर्तरूपी विठ्ठलाचे मनुष्यस्वरुप दाखवण्यात येणार असून यात अभिनेता सचित पाटील विठ्ठलाची भूमिका करणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

राजीव रुईया दिग्दर्शित या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच सोशल नेट्वर्किंग साईटवर प्रदर्शित करण्यात आलं. सावळ्या विठ्ठलाचे मनोहारी रूप दाखवणाऱ्या या पोस्टरवर सचित पाटील दिसत असून, सचितचा हा विठ्ठल अवतार प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे.

आजच्या आधुनिक युगात देव आणि भक्त यांच्यामधील नातं सांगणारा हा चित्रपट १४ डिसेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. ‘विठ्ठल’ नामाचा गजर करणाऱ्या या चित्रपटाची दशरथ सिंह राठोड आणि उमेद सिंह राज पुरोहित यांनी निर्मिती केली आहे. ‘विठ्ठल’ या चित्रपटाची पटकथा रवींद्र पाटील यांची असून, संदीप

दंतवते यांनी संवादलेखन केले आहे. तसेच, या चित्रपटात हर्षदा विजय ही नवोदित अभिनेत्रीदेखील आपल्याला पाहायला मिळणार असून, अशोक समर्थ, भाग्यश्री मोटे, दीप्ती धोत्रे आणि हितेन तेजवानी या कलाकारांचादेखील यात समावेश आहे.