मुंबईमध्ये स्वतःचं घर असणं हे प्रत्येकाचंच स्वप्न असतं. असं घर जे नवीन स्वप्न दाखवायला बळ देतं आणि ती स्वप्नं पूर्ण झाली की परत त्या घरात येण्याची ओढ निर्माण करतं.
सागर कारंडेच्या बाबतीतही असंच काहीसं झालं आहे. सागरने काही दिवसांपूर्वीच एक नवीन घर घेतलं. या घरात त्याने पूजाही घातली. त्याचे माहिमला स्वतःचे घर तर आहेच. ज्या घराने त्याला नावारुपाला आणलं त्याच घराच्या साक्षीने त्याने आता अजून एक घर घेतलं आहे. काही दिवसांपूर्वी या घरात त्याने पूजाही केली होती. पूजेचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर शेअरही केले होते. त्याच्या या फोटोंना त्याच्या चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेन्ट्सही दिल्या. ‘फू बाई फू’, ‘चला हवा येऊ द्या’ या विनोदी कार्यक्रमांमुळे प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.
त्याने त्याच्या घराचे आणि पूजेचे तीन फोटो फेसबुकवर टाकले आहेत. याला सुमारे ६.८ हजार एवढे लाइक्स आणि ३५ हून जास्त कमेन्ट्स आल्या आहेत. अभिनेता आणि त्याचा जिगरी मित्र भारत गणेशपुरे आणि अभिनेत्री श्रेया बुगडेही त्याच्या आनंदात सहभागी झाले होते. नवीन घर नवी सुरुवात अशा प्रकारचा मेसेज लिहून त्याने फेसबुकवर हे फोटो शेअर केले आहेत. लोकसत्ता ऑनलाइनकडूनही सागर कारंडेला खूप खूप शुभेच्छा.