मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. मनोरंजनसृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. नुकतंच संकर्षणने एक पोस्ट करत प्रेक्षकांना विनंती केली आहे.

गौरी थिएटर निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच सध्या सर्वत्र चर्चा आहे. नुकतंच या निमित्ताने संकर्षण कऱ्हाडेने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने त्याच्या परदेश दौऱ्यावर जातानाचा फोटो शेअर केला आहे.
आणखी वाचा : इंडिया आणि भारत वादादरम्यान अक्षय कुमारचा मोठा निर्णय, आगामी चित्रपटाच्या नावात केला बदल

Paani Movie on the Water Crisis
Paani Movie Review : पाणी संघर्षाला प्रेमाचा ओलावा
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
varun dhawan plays spy role for the first time in web series citadel honey bunny
गुप्तहेराच्या भूमिकेत वरुण धवन; ‘सिटाडेल’च्या भारतीय आवृत्तीची झलक प्रेक्षकांसमोर
tv serial actress arrested for kidnapping 4 year child in vasai zws
अपहृत चिमुकल्याची ४ तासात सुखरूप सुटका; टिव्ही मालिकेतील अभिनेत्रीला अटक
Loksatta anvyarth Actor comedian Atul Parchure passed away
अन्वयार्थ: अभ्यासू अभिनेत्याचे जाणे…
Pahile Na Mi Tula Marathi Natak Preview
नाट्यरंग : पाहिले न मी तुला – दृष्टिकोनातील फरकाचा लोच्या
Navratri wishes in marathi | Ghatasthapana 2024 | Navratri 2024
Navratri Wishes 2024 : नवरात्रीच्या द्या प्रियजनांना हटके शुभेच्छा, पाहा एकापेक्षा एक सुंदर मेसेज
Justice Gawai over Laddu case
Tirupati Laddu Row : “जेवणात लाडू नसतील अशी आशा आहे”… जेव्हा सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीशही हास्यविनोद करतात!

“अमेरिकेला जाउन येतो. १४ प्रयोगांची मोठ्ठी वारी आहे. भारतातल्या प्रेक्षकांनो शुभेच्छा , आशीर्वाद असु द्या. अमेरिकेतल्या मराठी रसिक प्रेक्षकांनो .. “नियम व अटी लागू….” नाटकाला या ….. भेटूच ..”, असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे.

आणखी वाचा : “पांढरे कपडे घालून खुर्चीवर…”, प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा स्टँप पेपर घोटाळ्याच्या मुख्य आरोपीबद्दल मोठा खुलासा, म्हणाला “मी अब्दुल करीम तेलगीला…”

संकर्षण कऱ्हाडे हा पुढील काही दिवस ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकत असणार आहे. त्यामुळे त्याच्या नाटकाचे प्रयोग महाराष्ट्रात होणार नाही. ‘नियम व अटी लागू’ या नाटकाचे लेखन संकर्षण कऱ्हाडेने केले आहे. तर याचे दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णींनी केले आहे. या नाटकात संकर्षण कऱ्हाडे, अमृता देशमुख आणि प्रसाद बर्वे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत.