संकर्षण कऱ्हाडे हा मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखला जातो. सोशल मीडियावर सक्रिय राहून तो नेहमीच त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडी चाहत्यांशी शेअर करत असतो. संकर्षण नुकताच माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेत झळकला होता. नाटक, मालिका या माध्यमांमध्ये तो काम करताना दिसून येतो. त्याने आजवर अनेक नाटकांमध्ये काम केले आहे मात्र एका नाटकातून त्याला काढून टाकतील अशी त्याला भीती वाटत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

संकर्षण कऱ्हाडेने काही वर्षांपूर्वी प्रशांत दामले यांच्याबरोबर साखर खाल्लेला माणूस हे नाटक केले होते. या नाटकात प्रशांत दामले, शुभांगी गोखले, रुचा आपटे, आणि संकर्षण कऱ्हाडे असे कलाकार होते. या नाटकाच्या प्रयोगादरम्यानचा किस्सा संकर्षणने एका मुलाखतीत सांगितला आहे. तो असं म्हणाला, “नागपूरच्या एका प्रयोगाला माझ्या सासूबाई नाटक बघण्यासाठी आल्या होत्या. त्यांना नाटकावर प्रतिक्रिया द्यायची होती त्या नाटक संपल्यावर आल्या आणि प्रशांत सर नेहमीप्रमाणे कामात होते. त्या प्रशांत सरांना म्हणाल्या, खूपच कॉमेडी होतं नाटक, यावर प्रशांत दामले म्हणाले अरे बापरे मला माहीतच नव्हतं. त्यानंतर मला असं वाटलं की आता माझ्या हातातून हे नाटक गेलं,” असा किस्सा त्याने सांगितला आहे.

Video : “मला सोडून प्रिया त्याच्याबरोबर…” काश्मीरमध्ये उमेश कामतबरोबर नेमकं काय घडलं?

संकर्षण कऱ्हाडे सध्या ‘तू म्हणशील तसं’ या नाटकात काम करत आहे. या नाटकाचं दिग्दर्शन प्रसाद ओकने केलं आहे तर नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली आहे. या नाटकात संकर्षण बरोबर भक्ती देसाई काम करत आहे. सध्या या नाटकाचे जोरदार प्रयोग होत आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sankarshan karhade sharing fun expirenece with prashant damle spg