मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडेला मनोरंजन सृष्टीतील एक बहुआयामी कलाकार म्हणून ओळखले जाते. त्याच्या अभिनयाचे, लिखाणाचे, दिग्दर्शनाचे, कवितांचे आणि त्याच्या सूत्रसंचालनाचे लाखो चाहते आहेत. संकर्षणने अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या संकर्षण हा तू म्हणशील तसं या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहे. त्या निमित्तानेच त्याने एक खास अनुभव शेअर केला आहे.

संकर्षण कऱ्हाडे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच संकर्षणने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत काही पत्र पाहायला मिळत आहेत. संकर्षणला ही सर्व पत्र त्याच्या चाहत्यांनी पाठवली आहेत. तसेच याला सुंदर कॅप्शन देत त्याने एक खास पोस्टही शेअर केली आहे.
आणखी वाचा : “चिपळूण ते मुंबई, करिअरची सुरुवात अन्…” ‘सहकुटुंब सहपरिवार’मधील अभिनेत्रीने सांगितला अनुभव, म्हणाली “अक्षरशः अंगात…”

heart-touching video | a young man shares the harsh reality of the world
“जेव्हा सर्व साथ सोडतात तेव्हा…” तरुणाने सांगितली खरी दुनियादारी; पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Emotional message for father
“डोळ्यातले अश्रु डोळ्यांतच जिरवण्याची ताकद फक्त ‘बापाकडे’ असते” तरुणाची पाटी होतेय व्हायरल, VIDEO एकदा पाहाच
devendra fadnavis criticize uddhav thackeray for making video of bag checking
“त्यांच्या आधी माझी बॅग तपासली, केवळ भांडवल…”, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
Supriya Sule criticizes Mahayuti over Uddhav Thackeray bag checking case Pune news
उद्धव ठाकरे यांच्या बॅग चेक प्रकरणावर सुप्रिया सुळे यांच मोठ विधान…..
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
readers reaction on different lokrang articles
पडसाद : हा तर बुद्धिभेद

संकर्षण कऱ्हाडेची पोस्ट

“प्रेक्षकांचा प्रत्येक शब्दं मोलाचा ….” गेल्या काही महिन्यांत प्रेक्षकांनी प्रयोगाला येउन मला अशी इनेक पत्रं दिली.. काही पत्रांमध्ये प्रचंड प्रेम होतं , कौतुक होतं , काहींमध्ये सुचना, भेटवस्तू , आणि काहींमध्ये काळजी .. प्रेक्षकांचा हा प्रत्येक शब्दं माझ्यासाठी मोलाचा आहे म्हणुन मी ही सगळी पत्रं आज लॅमिनेट करुन आणलीयेत आणि त्याची फाईल तयार केली आणि आता ह्या सगळ्या पत्रांना मी माझ्या स्वतःच्या अक्षरांत पत्रं लिहूनच उत्तर देणार.. (माझं अक्षर नाहीच कळणार तरीही.. करा आता सहन)

पण , मोलाची गोष्टं ही कि सेल्फीच्या जमान्यात हा पत्रं प्रपंच माझ्यात आणि प्रेक्षकांमध्ये होणार भेटूच ….., असे संकर्षणने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

आणखी वाचा : “माझ्या पार्थिवावर अंत्यसंस्कार…”, नितीन देसाईंची शेवटची इच्छा काय होती? ND स्टुडिओतील कर्मचाऱ्याचा खुलासा

दरम्यान संकर्षण कऱ्हाडे हा सध्या विविध नाटकांमध्ये झळकत आहे. ‘नियम व अटी लागू’, ‘तू म्हणशील तसं’ आणि ‘संकर्षण Via स्पृहा’ या तीन नाटकात दिसत आहे. त्याच्या या तिनही नाटकांच्या प्रयोगांना प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहेत.