मराठी मालिका, चित्रपटांमधून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणून संतोष जुवेकरला (Santosh Juvekar)ओळखलं जातं. संतोष जुवेकरने ‘झेंडा’, ‘मोरया’, ‘एक तारा’ आणि ‘रेगे’ यांसारख्या मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारल्या. त्याच्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. संतोषचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. सोशल मीडियाद्वारे तो नेहमीच चाहत्यांशी संवाद साधतो. आता तर त्याने चक्क शर्टलेस फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे.

आणखी वाचा – “तेव्हा माझे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पण…” अभिनेता रितेश देशमुख स्पष्टच बोलला

संतोष सोशल मीडियाद्वारे व्यक्त होणाऱ्या कलाकारांपैकी एक आहे. तो इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे विविध पोस्ट शेअर करताना दिसतो. आता संतोषने चक्क शर्टलेस फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून संतोष त्याच्या शारीरिक फिटनेससाठी बरीच मेहनत घेत असल्याचं दिसून येतं. नियमित व्यायाम संतोष करत असणार हे यामधून स्पष्ट होतं. पण या फोटोला त्याने एक हटके कॅप्शन दिलं आहे.

आपला शर्टलेस फोटो शेअर करत त्याने सगळ्यांना एक वेगळाच प्रश्न विचारला आहे. “आता मी या फोटोवरून ट्रोल होणार का? हो किंवा नाहीमध्ये उत्तर द्या.” असं संतोषने म्हटलं आहे. संतोषचा हा फोटो म्हणजे मिरर सेल्फी आहे. यामध्ये त्याचा फिटनेस अनेक तरुण मंडळींना लाजवणारा आहे. त्याचा फिटनेस आणि बदलता लूक पाहता संतोष त्याच्या आगामी प्रोजेक्टची पूर्वतयारी करत असल्याचं दिसतंय.

आणखी वाचा – VIDEO : झोप अनावर झाली अन्…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवरील वनिता खरातचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

संतोष मराठीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचा याआधी ‘हिडन’ चित्रपट हा ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. या चित्रपटात संतोष जुवेकरने पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती. शिवाय मराठी चित्रपट, मालिकांमध्ये काम करत त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं.

Story img Loader