वीर सावरकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या मुद्द्यावरून देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अलीकडेच ‘भारत जोडो’ यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं. ‘सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागतली होती, ते ब्रिटीशांकडून पेन्शन घेत होते’, अशा आशयाचं विधान राहुल गांधींनी केलं. त्यांच्या विधानानंतर महाराष्ट्रसह देशभरातील राजकीय नेत्यांकडून निषेध केला. यावरुन सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. त्यातच आता अभिनेते शरद पोंक्षे यांनी उडी घेतली आहे.

अभिनेते शरद पोंक्षे हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोत ‘माफीवीर जवाहरलाल नेहरु’ असे लिहिण्यात आले आहे. त्याबरोबर ‘नेहरुंचे आत्मचरित्र’ असेही यात म्हटले आहे. याबरोबर त्यांनी काही संदर्भही दिले आहे.
आणखी वाचा : “माझ्या जगण्याचं कारण…” दिवंगत अभिनेत्री एंड्रिला शर्माची शेवटची पोस्ट

State Congress president Nana Patole demanded those who desecrate constitution should punished
“संविधानाची विटंबना करण्याचे धाडस होतेच कसे,” नाना पटोले यांची टीका; म्हणाले…
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
News About Parliament
BJP : उपराष्ट्रपती व्ही. पी. धनखड यांना हटवण्यासाठी विरोधकांचा गोंधळ, भाजपाने नेमकी काय खेळी केली?
Sanjay Raut on Opration Lotus
Sanjay Raut : ‘मविआ’चे खासदार फुटणार असल्याची चर्चा; संजय राऊत म्हणाले, “भाजपा कोणतंही ऑपरेशन लोटस…”
Sudhir Mungantiwar On Karnataka
Sudhir Mungantiwar : “कर्नाटक सरकारला याचा हिशेब द्यावा लागेल”; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा, कारण काय?
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!
What Devendra Fadnavis Said About Rahul Narwekar ?
Devendra Fadnavis : “राहुल नार्वेकर पुन्हा येईन म्हणाले नव्हते तरीही पुन्हा आले..”, देवेंद्र फडणवीस यांचं खुमासदार भाषण

शरद पोंक्षेंनी दिलेले संदर्भ खालीलप्रमाणे

“१४ दिवसांचा तुरुंगवास सहन न झाल्याने त्यांचे वडील मोतीलाल नेहरुंच्या मध्यस्थीने ब्रिटीश सरकारची माफी मागून नाभा तुरुंगातून बाहेर पडले. एवढंच नाही एकूण ४ जणांना अटक केले असता, नेहरुंनी त्यांच्या जवळ मित्रांची सुटका करुन घेतली व चौघांचे आळ एकावर टाकून तुरुंगात तिघांनी सुटका करुन घेतली

जवाहरलाल नेहरुंना स्वातंत्र्या लढ्यात अनेकदा शिक्षा झालाी पण प्रत्येक वेळी त्यांना कारागृहात न ठेवता नजरकैद किंवा खास व्यवस्थेत ठेवले गेले. नेहरु केवळ एकदाच कारागृहात गेले ते ही केवळ १४ दिवस तेथून आपल्या वडिलांच्या मदतीने ब्रिटिशांची माफी मागून ते बाहेर पडले. त्याच नाभा जेलची ही कथा..

जेलमधील घाण आणि रोगराई पाहून नेहरुंना आपल्या जीवाची भीती वाटत होती. एका मोठ्या राजकीय घराण्याची संबंधित असल्याने खुद्द व्हाइसरॉय ने त्यांची चौकशी केली. त्यावेळी जवाहरलाल नेहरुंनी आपल्या वडिलांना पत्र लिहून इथली अवस्था सांगितली. मोतीलाल नेहरुनी तडक व्हाईसरॉय भेट घेत सुटकेची मागणी केली.

नाभा आंदोलनात पकडलेल्या ४ जणांपैकी नेहरु आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना शिक्षेवर सशर्त स्थगिती मिळाली. सर्व आळ त्यांच्या ४ थ्या सहकाऱ्यावर टाकण्यात आला. सुटका होताना पुन्हा नाभामध्ये पाऊल ठेवणार नाही, असा अर्ज लिहून नेहरुंनी ब्रिटीश सरकारची माफी मागितली.

त्यांचे सहकारी आचार्य गिडवाणी नाभाला परत निघाले असताना वडील आणि गांधी यांच्या सल्ल्याने जवाहरलाल ने यायला नकार दिला. त्यानंतर पुन्हा कधीच त्यांची पाऊले नाभाकडे वळली नाही”, असे शरद पोंक्षे यांनी या फोटोत म्हटले आहे.

आणखी वाचा : भलेमोठे दरवाजे, विंटेज फर्निचर, अलिशान खोल्या; सैफ अली खानचा ८०० कोटींचा पतौडी पॅलेस आतून कसा दिसतो?

याला कॅप्शन देताना ते म्हणाले, “जे सतत सावरकरांचं पत्र दाखवतायत त्यांच्यासाठी ही पत्रेही पहा. जितक्या गलिच्छ शब्दात ज्यांनी प्रतिक्रिया दिल्या त्यांनी तीच भाषा आताही वापरा.” दरम्यान शरद पोंक्षे यांची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होताना दिसत आहे. यावर अनेक प्रतिक्रियाही उमटताना दिसत आहे.

Story img Loader