Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2023: भारतात दरवर्षी १४ एप्रिल रोजी भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली जाते. या जयंतीला आंबेडकर जयंती किंवा भीम जयंती म्हणून ओळखलं जाते. यानिमित्ताने अनेक नागरिक तसेच सेलिब्रिटीही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करताना दिसत आहेत. नुकतंच अभिनेते शरद पोंक्षे यांनी आंबेडकर जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
शरद पोंक्षे यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्याबरोबर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा एक विचारही यानिमित्ताने शेअर केला आहे.
आणखी वाचा : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरेची आंबेडकर जयंतीनिमित्त खास पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाला, “बाबासाहेब…”
शरद पोंक्षे यांची पोस्ट
“”राज्यघटना ही पोशाखाप्रमाणे अंगास चांगली चपखल बसली पाहिजे. अध्यक्ष महाराज मी प्रतिज्ञा पूर्वक सांगतो की, जेव्हा जेव्हा माझे वैयक्तिक हित की सर्व देशाचे हित यात संघर्ष निर्माण झाला, तेव्हा तेव्हा मी देशाच्या हिताला प्राधान्य दिले, स्वतःच्या हिताला दुय्यम मानले ,स्वहित बुद्धीने मी आयुष्यात मार्ग चोखाळलेला नाही. जर मी आपल्या शक्तीचा आणि परिस्थितीचा स्वतःसाठी उपयोग केला असता, तर आज मी दुसऱ्याच एखाद्या स्थानी असतो. देशाच्या मागण्यांचा जेव्हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा तेव्हा मी इतरांच्या पाठीमागे आहे तसुभरही नव्हतो, परंतु या देशातील जनतेच्या मनात मी नसती शंका राहू देणार नाही.
मी दुसऱ्या एका अशा काही निष्ठेला बांधला गेलो आहे, की तिला मी कधीही अंतर देऊ शकणार नाही. ती निष्ठा म्हणजे माझा अस्पृश्यवर्ग .त्यांच्यात मी जन्मास आलो .त्यांचा मी आहे. जीवात जीव असेपर्यंत मी त्यांना अंतर देणार नाही .यास्तव या विधिमंडळाला मी दृढनिष्ठेपूर्वक सांगतो की, जेव्हा अस्पृश्यांचे हित व देशाचे हित यामध्ये संघर्ष निर्माण होईल, त्यावेळी माझ्यापुरते मी सांगतो की मी अस्पृश्यांच्या हितालाच प्राधान्य देईन. देशाचे हित आधी की, माझे हित आधी असा प्रश्न उद्भवला तर मी आधी देशाचेच हित पाहीन. तसेच माझ्या समाजाचे हित आधी की देशाचे हित आधी असा जेव्हा प्रश्न उपस्थित होईल तेव्हा मी अस्पृश्य वर्गाच्या हिताच्याच बाजूने उभा राहील.”” डॉ बाबासाहेब आंबेडकर. ह्या महामानवास विनम्र अभिवादन, अशी पोस्ट शरद पोंक्षे यांनी केली आहे.
आणखी वाचा : “आमचं लग्न…” प्रार्थना बेहेरेबरोबर अफेअरच्या चर्चांवर वैभव तत्त्ववादीचे वक्तव्य
शरद पोंक्षे यांच्या या पोस्टवर अनेक जण कमेंट करताना दिसत आहेत. ‘जय भीम’ अशी कमेंट एकाने या पोस्टवर केली आहे. तर एकाने ‘महामानवास विनम्र अभिवादन’ असे म्हटले आहे. तर अनेकांनी ‘विनम्र अभिवादन’ असे म्हणत कमेंट केली आहे.