मराठी अभिनेते शरद पोंक्षे गेली अनेक वर्ष नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमात काम करताना दिसले आहेत. त्यांच्या अभिनयाचे चाहते मोठया प्रमाणावर आहेत. ते सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते वेगवेगळ्या सामाजिक आणि राजकीय मुदद्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपलं मत बेधडकपणे मांडताना दिसतात. त्यांचं ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक खूप गाजलं, हे नाटक वादात सापडलं नंतर कोर्टात गेलं मात्र कोर्टाने या नाटकाला परवानगी दिली. नाटकाचे प्रयोग करताना आलेले अनुभव त्यांनी ‘मी आणि नथुराम’ या पुस्तकात लिहले आहेत. काही दिवसांपूर्वी हे पुस्तक प्रदर्शित झाले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या पुस्तकात त्यांनी १९८८ पासूनचे म्हणजे जेव्हापासून नाटकाचे प्रयोग सुरु झाले तेव्हपासूनचे अनुभव लिहले आहेत. ज्यात त्यांच्यावर ओढवलेल्या एका जीवघेण्या प्रसंगाबद्दल सांगितले आहे. नथुराम हे नाटक कोर्ट कचेरीतुन बाहेर पडले होते त्यामुळे या नाटकाचे प्रयोग पुन्हा सुरु झाले होते. शरद पोंक्षे यांनी लिहलं आहे की ‘आम्ही नाटकाच्या दौऱ्यावर जाण्याआधी एक मुंबईत प्रयोग करणार होतो तो प्रयोग होता कालिदास नाट्यगृह मुलुंड येथे, मी प्रयोगाच्या आधी मित्राकडे जेवायला गेलो होतो तेव्हा मला फोन आला की आपल्या नाटकाचे सामान, बस जाळली आहे. मी लगेचच नाट्यगृहापाशी पोहचलो सगळं प्रकार बघितला. तो पर्यंत प्रयोगाची वेगळी झाली होती. आमचा सेट अर्धवट जळाला होता, काही कलाकारांचे कपडे जळून खाक झाले होते’. प्रेक्षक नाट्यगृहात आले मी त्यांच्यासमोर स्टेजवर आलो आणि घडलेला प्रसंग सांगितला, ‘मी प्रेक्षकांना सांगितलं की आम्ही त्या अवतारात प्रयोग करण्यासाठी तयार आहोत, आमचे कपडे सेट पूर्णपणे जळाले आहेत. तुमची तयारी असेल आम्हाला अशा अवस्थेत बघायची तर मी प्रयोग सुरु करतो. प्रेक्षकांनामधून एकच आवाज आला, ‘शरदजी आज आम्हाला रंगभूषा, वेशभूषा काही पहायची नाही, फक्त आणि फक्त तुमचा अभिनय पहायचा आहे’.

नातेसंबंध टिकून राहावे यासाठी बोमन इराणींनी दिला सल्ला, म्हणाले “आजचं भांडण उद्या…”

मराठी नाटक आणि प्रेक्षक यांचं एक अतूट नातं आहे. मराठी नाटकाला १०० हुन अधिक वर्षांची परंपरा आहे. करोना काळात नाट्यगृह बंद होती, मात्र आता मराठी रंगभूमीवर अनेक नाटकं येत, रसिक प्रेक्षकदेखील या नाटकांना गर्दी करत आहेत. अभिनेते प्रशांत दामले गेली अनेक वर्ष नित्यनियमाने नाटक करत आहेत आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.

शरद पोंक्षे यांनी हे नाटक अनेक वर्ष केले, या नाटकादरम्यान त्यांना धमकीचे फोनदेखील आले होते. मात्र त्यांनी आणि नाटकाच्या पूर्ण टीमने न घाबरता या नाटकाचे प्रयोग सुरु ठेवले. या नाटकाने १००० प्रयोग केले. महाराष्ट्राचं नव्हे तर गोव्यातदेखील या नाटकाने हाऊसफुल्लचे बोर्ड बघितले. लेखक प्रदीप दळवी यांनी हे नाटक लिहले होते तर विनय आपटे यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor sharad ponkshe shared horrible experience while playing nathuram godse character spg