मराठी नाट्य, चित्रपटसृष्टीतील आघाडीचे शरद पोंक्षे कायम चर्चेत असतात. सोशल मीडियावर ते कायमच सक्रिय असतात. सामाजिक, मुद्द्यांवर ते कायमच भाष्य करताना डोसून येतात. सध्या भिडे गुरुजींच्या वादग्रस्त वक्त्यावामुळे एकच समाजमाध्यमात चर्चा सुरु आहे ती स्त्री स्वातंत्र्याची, त्यावरच भाष्य करणारी एक पोस्ट शरद पोंकसे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केली आहे.
शरद पोंक्षे यांनी आपल्या पोस्टमध्ये एका चर्च बाहेरचा फोटो शेअर केला आहे. पोस्टला कॅप्शन देत म्हणाले, ‘एका चर्चच्या बाहेर लावलेला फलक. यात स्त्रियांनी काय कपडे घालावे याच्या सूचना आहेत. पाद्रींचे आडनाव भिडे/कुलकर्णी नसल्याने यात स्त्रीच्या स्वातंत्र्याचा अपमान होत नाही.’ असं म्हणत त्यांनी पोस्ट शेअर केली आहे त्यांनी नमूद केले आहे की ‘सध्याच्या परिस्थितीशी याचा संबंध नाही’, मात्र त्यांची ही पोस्ट नक्कीच सध्याच्या घटनेला टोला लगवणारी आहे.
“कशाला पाहिजे टिकली फिकली…” मराठी अभिनेत्रीची ‘ती’ पोस्ट चर्चेत
शिवप्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराने कुंकू लावलं नसल्याने संभाजी भिडे यांनी तिच्याशी बोलण्यास नकार दिला. त्यांच्या या घटनेचा अनेकांनी निषेध केला. महिला आयोगाने संभाजी भिडेंच्या विधानाची दखल घेतली असून त्यांना नोटीस पाठवली आहे.
दरम्यान शरद पोंक्षे नुकतेच ‘हर हर महादेव’ या चित्रपटात दिसले आहेत. तसेच झी मराठी वाहिनीवर सुरु झालेल्या ‘दार उघड बये’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत.