अभिनेता श्रीकर पित्रे सोशल मीडियाच्या माध्यमातून कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असतो. त्याने आपल्या चाहत्यांना नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
श्रीकर नुकताच बाबा झाला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट्सवरून आपल्याला मुलगा झाल्या असल्याचं कळवलं आहे. “आम्हाला मुलगा झाला आहे. जो आम्हाला मदर्स डे आणि फादर्स डेच्या शुभेच्छा देईल अशा पाहुण्याचं स्वागत करण्यास आम्हाला आनंद होत आहे”, अशा कॅप्शनसह त्याने ही पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
यात त्याने आपली पत्नी पूर्वा सारस्वत हिलाही आपल्या फेसबुक पोस्टमध्ये टॅग केलं आहे. श्रीकर मराठी रंगभूमीवरचा एक सुपरिचित अभिनेता आहे. त्याने काही बालनाट्यांमध्येही काम केलं आहे. ‘जंबा बंबा बू’ हे त्याचं बालनाट्य बरंच चर्चेत आहे. त्याने अनेक मराठी मालिकांमधून काम केलं आहे. ‘ती फुलराणी’, ‘लव लग्न लोचा’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’ अशा काही मराठी मालिकांमध्येही त्याने काम केलं आहे. ‘चुभन’, ‘इश्क वाला लव्ह’ अशा काही चित्रपटांमध्येही त्याने काम केलं आहे. तो कायम आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओज आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत असतो.