मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता म्हणून सिद्धार्थ जाधवला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांमुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून सिद्धार्थ जाधवचे एकामागोमाग एक चित्रपट प्रदर्शित झाले. त्याचा ‘तमाशा लाईव्ह’, ‘दे धक्का २’ या चित्रपटांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. सध्या सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. नुकतंच त्याने क्रांती रेडकरबरोबर एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

क्रांती रेडकर ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. नुकतंच तिने आणि सिद्धार्थ जाधव या दोघांनी एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. या रिल व्हिडीओ क्रांतीने सिद्धार्थ जाधवची त्याच्या दिसण्यावरुन खिल्ली उडवली आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे.
आणखी वाचा : “माझ्या १६९ गर्लफ्रेंड होत्या अन् बिग बॉस…” शिव ठाकरेने केला खुलासा

या व्हिडीओत सिद्धार्थ क्रांतीला म्हणतो, ‘बेबी तू खूप सुंदर आहेस.’ त्यावर क्रांती म्हणते ‘धन्यवाद, जर तू पण इतका सुंदर असतास तर मी तुलाही हे बोलू शकले असते.’ तर सिद्धार्थ म्हणाला, ‘काही हरकत नाही, माझ्यासारखं खोटं खोटं तरी बोल…’ त्यावर क्रांती रागात, चिडलेल्या अवतारात त्याच्याकडे पाहते आणि सिद्धार्थ मात्र नजर चोरत असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा : “मराठीपेक्षा हिंदी चित्रपट…” रितेश देशमुखचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

दरम्यान क्रांती रेडकर आणि सिद्धार्थ जाधवचा हा व्हिडीओ मजेशीर आहे. या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तर या व्हिडीओला अनेक लाईक्स मिळाल्याचेही पाहायला मिळत आहे.

सध्या क्रांती रेडकर हिने निर्माती म्हणून सिनेक्षेत्रात पदार्पण केले आहे. ‘दॅट हॅप्पी गर्ल’या रिअॅलिटी शो द्वारे ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीत सक्रीय होणार आहे. हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. तर सिद्धार्थ जाधव हा स्टार प्रवाहवरील आता ‘होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमात निवेदक म्हणून काम करत आहे. सध्या हा शो चांगलाच लोकप्रिय ठरताना दिसत आहे. यात त्याच्या हटके स्टाईलने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. तसेच लवकरच तो एका हिंदी चित्रपटातही झळकणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor siddharth jadhav share reel video with kranti redkar goes viral nrp