२००८ मध्ये प्रदर्शित झालेला ‘दे धक्का’ चित्रपट आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाने पहिल्या भागात केलेली हीच धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. मनोरंजनाचा डबल डोस असलेला ‘दे धक्का २’ हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. या चित्रपटात अभिनेता सिद्धार्थ जाधवने धनाजी ही भूमिका साकारली होती. त्याची ही व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. आता त्याला या भूमिकेसाठी विशेष पुरस्कार मिळाला आहे.
नुकतंच झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्याची नामांकन काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती. यातील सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता या पुरस्कारसाठी अभिनेता सिद्धार्थ जाधवला नामांकन देण्यात आले होते. नुकतंच सिद्धार्थला हा पुरस्कार जाहीर झाला आहे. नुकतंच त्याने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Exclusive : ‘मी शूटींग बंद करतोय…’ म्हणत सिद्धार्थ जाधववर संतापले महेश मांजरेकर, वाचा नेमकं काय घडलं?
सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने त्याच्या लेकीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो त्याच्या लेकीसोबत उभा असल्याचे दिसत आहे. त्यात त्याच्या लेकीच्या हातात झी मराठीचा पुरस्कार पाहायला मिळत आहे. तर सिद्धार्थ हा तिच्याकडे पाहत आहे. त्यासोबत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे.
“झी टॉकीज कॉमेडी अवॉर्ड्स २०२२ मध्ये मला दे धक्का २ साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता हा पुरस्कार मिळाला. मला याचा फार आनंद आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी महेश मांजरेकर सर आणि अमेय खोपकर यांचा आभारी आहे. दे धक्का २ च्या संपूर्ण टीमला खूप खूप प्रेम.” असे कॅप्शन सिद्धार्थने दिले आहे. दरम्यान या फोटोत त्याने हॉलिवूड अभिनेता विल स्मिथच्या ‘द परस्यूट ऑफ हॅपिनेस’ या चित्रपटातील एक ऑडिओ शेअर केला आहे.
आणखी वाचा : अभिनेत्री मिनाक्षी राठोड आणि कैलास वाघमारेच्या लेकीचं नाव ठरलं, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…
दरम्यान या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि सुदेश मांजरेकर यांनी केलं आहे. तसेच अमेय खोपकर यांच्या बॅनरअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. दे धक्का २ हा चित्रपट ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे.