मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोध भावेच्या निर्मिती संस्थेची पहिली वेबसीरिजच्या शूटींगचा पहिला टप्पा संपला आहे. यानिमित्ताने त्याने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

सुबोध भावे हा इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच सुबोधने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने त्याच्या निर्मिती संस्थेच्या पहिल्या वेबसीरिजमधील टीमचा फोटो शेअर केला आहे. याला त्याने हटके कॅप्शनही दिले आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेची खास पोस्ट, पत्नीला शुभेच्छा देत म्हणाला…

सुबोध भावेची इन्स्टाग्राम पोस्ट

“कान्हाज मॅजिक” या आमच्या निर्मिती संस्थेची पहिली वेब सीरिज. आणि या पहिल्या वेब सीरिजचा शूटिंगचा पहिला टप्पा आज संपला.

२२ मे पासून पुणे,भोर, वाई आणि परत पुणे अस सलग ५७ दिवस संपूर्ण टीम न थांबता,न थकता,अविश्रांत मेहेनत घेऊन काम करत होती.

अजून प्रवास मोठा आहे पण पहिला टप्पा आज गाठला. पुन्हा सप्टेंबर मध्ये शूट चालू होईल आणि मग खऱ्या अर्थाने या वेब सीरिज च शूट संपेल. यात कोण दिग्दर्शन करतय,कोण काम करतय हे सगळंच तुमच्या समोर येईल. माझ्या संपूर्ण संघाचे मनपूर्वक आभार.

कधी एकदा ही वेब सीरिज तुमच्या समोर घेऊन येतोय असं झालंय. पुन्हा पुढच्या बातमीसह लवकरच भेटू”, असे सुबोध भावे म्हणाला.

“मस्तानीनंतर झोप…” सुबोध भावेच्या पोस्टपेक्षा कलाकारांच्या कमेंट्सचीच चर्चा

दरम्यान सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. यावर कमेंट करताना अभिनेता स्वप्निल जोशी याने अभिनंदन भावा, तुला आणि तुझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन, अशी कमेंट केली आहे. तर अभिनेत्री अमृता खानविलकरने मस्तच अशी कमेंट केली आहे. तसेच अभिनेत्री सायली संजीव हिने देखील यावर अभिनंदन अशी कमेंट केली आहे.

Story img Loader