मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावेने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तो सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सुबोध भावे हा लवकरच एका नव्या कोऱ्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. या निमित्ताने त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुबोध भावे आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये झळकला आहे. आता लवकरच तो एका नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसणार आहे. ‘बस बाई बस’ असं या कार्यक्रमाचं नाव असणार आहे. येत्या आठवड्यापासून हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने सुबोधने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने आगामी मालिकेबद्दलचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. तसेच त्याने त्याच्या जुन्या मालिकांची आठवणही काढली आहे.

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सुबोध भावेची खास पोस्ट, पत्नीला शुभेच्छा देत म्हणाला…

सुबोध भावेची इन्स्टाग्राम पोस्ट

“हे झी मराठीवाले मला वेगवेगळ्या वाहनातून लई फिरवतात राव, “कुलवधू” ला घोड्यावरून एन्ट्री, “तुला पाहते रे” ला विमान आणि आता “बस बाई बस ” च्या वेळेस प्रत्यक्ष बस आणि या प्रवासात मी एकटा नाही तर सोबतीला सर्वसामान्य गृहिणीच प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातील ५ महिला आणि जिच्या आयुष्याचा प्रवास जाणून घेणार आहोत ती एक सेलिब्रिटी महिला. आता बोला…..

आज मुंबईत प्रत्यक्ष बस मध्ये या कार्यक्रमा संदर्भात पत्रकार मित्र – मैत्रिणींशी गप्पा झाल्या. थोडक्यात काय तर २९ जुलै पासून तुमचं मनोरंजन करायला आम्ही सगळे येतोय. २९ जुलै पासून दर शुक्र आणि शनि. रात्री ९.३० वाजता. फक्त झी मराठीवर”, असे सुबोध भावेने या पोस्टमध्ये म्हटले आहे.

“अजून प्रवास मोठा आहे पण…”, अभिनेता सुबोध भावेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान सुबोध भावे हा गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीत सक्रीय आहे. त्याने एक उत्कृष्ट कलाकार म्हणून अनेक नाटक, मालिका आणि चित्रपटात अभिनयाची चमक दाखवली आहे. यानंतर आता लवकरच सुबोध हा ‘बस बाई बस’या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा कार्यक्रम स्त्रियांसाठी खास असणार आहे. यात सुबोध स्त्रियांसाठी राखीव अशी लेडीज स्पेशल बसचं नेतृत्व करताना दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor subodh bhave share instagram post talk about bas bai bas new marathi serial nrp