मराठी सिनेसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून सुबोध भावेला ओळखले जाते. सुबोध भावे हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच मुंबईत उभ्या राहणाऱ्या मराठी नाट्य विश्व या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या बोधचिन्हाचे अनावरण झाले. याच पार्श्वभूमीवर सुबोध भावे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी राज्य सरकारसह मुंबई महापालिकेचे आभार व्यक्त केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुबोध भावे याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने मराठी नाट्य-विश्व संदर्भातील एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी ही इमारत कशी असणार, त्यात नेमकं काय असणार, याबद्दल सांगण्यात आलं आहे. याला कॅप्शन देताना त्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसह राज्य सरकारचे कौतुक केले आहे.

“अरे माणूस आहेस का भूत”, दिलीप प्रभावळकरांना बाळासाहेब ठाकरे असं का म्हणाले? मुख्यमंत्र्यांनी सांगितला किस्सा

सुबोध भावेची इन्स्टाग्राम पोस्ट

“तुम्हा सगळ्यांबरोबर ही आनंदाची बातमी शेअर करताना अतिशय अभिमान वाटतोय. जगभरात कुठेही नाटकाचं संग्रहालय नाही. जगातील पहिलं नाटकाचं संग्रहालय उभारण्याचा मान आपल्या महाराष्ट्राला मिळतोय. आणि हे संग्रहालय असणार आहे मराठी नाटकाचं “मराठी नाट्य विश्व”.

मुंबई येथे गिरगाव चौपाटी वर सद्य स्थितीत असलेल्या बिर्ला क्रीडा केंद्र च्या जागी हे भव्य दिव्य आणि मराठी नाटकाचा इतिहास सांगणार “मराठी नाट्य विश्व” उभं राहतय. मराठी नाटकाच्या सर्व शाखा आणि सर्वांना सामावून घेणारं हे संग्रहालय असेल. जगभरातील नाटकाच्या अभ्यासक आणि रसिक प्रेक्षकांसाठी हे एक आनंदाचं दालन असेल. ही कल्पना आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दव ठाकरे यांची. त्यांच्या कल्पनेतून हे मराठी नाटकाचं संग्रहालय उभे रहात आहे.

महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हे स्वप्न प्रत्यक्षात साकार होतंय. आणि आज मा.मुख्यमंत्री यांच्या हस्ते “मराठी नाट्य विश्व” चं बोधचिन्ह आणि वास्तूचं स्वरूप लोकार्पण करण्यात आलं. आम्हा सर्व रंगकर्मी आणि नाटकावर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांच्या वतीने मी मा.मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,महाराष्ट्र सरकार आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे मनापासून आभार व्यक्त करतो”, असे सुबोध भावे म्हणाले.

“नागराज तुझ्या आयुष्यातील…”, अभिनेता सुबोध भावेंची पोस्ट चर्चेत

दरम्यान सुबोध भावेच्या या पोस्टवर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केल्या आहेत. यावर कमेंट करताना अभिनेता स्वप्निल जोशी याने कमाल भावा, पूर्ण टीमचे अभिनंदन, अशी कमेंट केली आहे. त्यासोबत इतरांनी फार छान, मस्त, अशा कमेंट केल्या आहेत. त्याची ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor subodh bhave share post on cm uddhav thackeray world first museum for theatres marathi natya vishwa built in mumbai nrp