‘कांतारा’ हा चित्रपट कर्नाटकातील एका लोककलेवर आणि तिथल्या अनुसूचित वर्गाच्या रूढी परंपरा यांच्यावर आधारित आहे. गावातील जमीनदार वर्गाची मक्तेदारी आणि त्यांनी केलेला अन्याय या गोष्टीलासुद्धा या चित्रपटाच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या चित्रपटाला आयएमडीबी या साईटवर सर्वात जास्त रेटिंग पाहायला मिळत आहे. मराठमोळा अभिनेता सुयश टिळक याने या चित्रपटाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.

सुयश टिळक याने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्याने ‘कांतारा’ या चित्रपटाच्या पोस्टरचा फोटो पोस्ट केला आहे. याला कॅप्शन देताना त्याने त्याला हा चित्रपट कसा वाटला त्याबद्दल सांगितले आहे. तसेच त्याने सर्वांना हा चित्रपट पाहावा, असे आवाहन केले आहे.
आणखी वाचा : Kantara Movie Review : आपल्या परंपरेला आणि लोककलेला अभिमानाने जगासमोर सादर करणारा ‘कांतारा’

Marathi drama Gosht Sanyukt Manapmanachi plays review
नाट्यरंग : गोष्ट संयुक्त मानापमानाची ; सम समा संयोग की जाहला…
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
Allu Arjun
‘पुष्पा’साठी राष्ट्रीय पुरस्कार घेताना अल्लू अर्जुन दु:खी का होता? स्वत: सांगितलं कारण
sushant singh rajput prateik babbar
सुशांत सिंह राजपूतने प्रतीक बब्बरला सांगितलेली ‘ही’ इच्छा राहिली अपूर्ण, खुलासा करत म्हणाला…
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”
shivani rangole shares beautiful birthday wish post for kavita medhekar
“ताई तुझ्याकडून कायम…”, ऑनस्क्रीन सासूबाईंसाठी शिवानी रांगोळेची खास पोस्ट! कविता मेढेकर कमेंट करत म्हणाल्या…
vicky kaushal in parshuram role
‘छावा’नंतर भगवान परशुरामाची भूमिका साकारणार विकी कौशल; सिनेमाचे पहिले पोस्टर आणि जबरदस्त लूक आला समोर

सुयश टिळकची इन्स्टाग्राम पोस्ट

“हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा. या चित्रपटाची कथा तुम्हाला वास्तव, अध्यात्म यासारख्या अनेक पातळ्यांकडे तुमचे लक्ष वेधून घेते. फारच अप्रतिम दिग्दर्शन, लेखन आणि कलाकारांची कामगिरी. या चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी ही फार उत्तम आहे. याशिवाय या चित्रपटातील दृश्य विलक्षण आहेत. त्यातील संगीतही मनाला भावते. ऋषभ शेट्टी याने एक उत्कृष्ट नमुना तयार केला आहे. तसेच चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आलेला कोला उत्सव आणि त्यासाठी केलेले नृत्य दिग्दर्शन यासाठी राज शेट्टी यांचे विशेष आभार.

हा चित्रपट तुमचं मनापासून मनोरंजन तर करतोच, पण त्याबरोबर त्यातील वास्तववादी गोष्टींवर तो खरेपणाने भाष्य करतो. अनेक स्टार मिळालेल्या आणि यशस्वी चित्रपटांपेक्षा हा चित्रपट नक्कीच चांगला आहे. हा चित्रपट नक्कीच मनापासून बनवला आहे. यात तुम्हाला त्या भूमीचे महत्त्व, लोकांचा असलेला विश्वास, लोककला याबद्दल खूप जास्त माहिती मिळते. त्यामुळे हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन एकदा तरी पाहायला हवा”, असे सुयश टिळक याने म्हटले आहे.

आणखी वाचा : “रतन टाटा आणि माझे…” अभिनेत्री सिमी गरेवाल यांनी रिलेशनशिपबाबत केला होता मोठा खुलासा

दरम्यान ‘कांतारा’ हा चित्रपट ३० सप्टेंबरला त्याच्या मूळ कन्नड या भाषेत प्रदर्शित झाला. प्रेक्षकांनी त्याचे कौतुक केले होते. सध्या या चित्रपटाने ९० कोटी इतकी कमाई केली आहे. याला मिळालेली लोकप्रियता पाहता या चित्रपटाला तेलुगू आणि हिंदी भाषेत डब करून प्रदर्शित करण्याचा निर्णय या चित्रपटाच्या निर्मात्यांनी घेतला.