मराठी अभिनेत्यांच्या यादीतील टॉप १० अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुयश टिळक. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकांबरोबरच तो नाट्यक्षेत्रातही प्रचंड सक्रीय असतो. सध्या तो ‘मी स्वरा आणि ती दोघं’ या नाटकात काम करत आहे. सुयश टिळक हा कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. नुकतंच सुयशने शासनाच्या कार्यक्रमांवर टीका केली आहे.

सुयश टिळकने नुकतंच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याला नाट्यगृहांच्या सध्याच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने विविध अडचणींबद्दल सांगितले. त्यावेळी त्याने शासनाचा कार्यक्रम असल्यावर आमच्या नाटकाचे प्रयोग रद्द केले जातात, असे सांगितले.
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

Abhishek Bachchan
अभिषेक बच्चनचं ‘ते’ वाक्य अन् अमिताभ बच्चन म्हणाले, “तुला शोमध्ये बोलवून चूक केली”; नेमकं काय घडलं?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Milind Gawali And Teja Devkar
पैसे संपले, अभिनेत्रीला कल्पना न देता निर्माते झाले पसार; नेमकं काय घडलेलं? मराठी अभिनेत्याने सांगितला ‘तो’ प्रसंग
Aishwarya Rai reaction when was introduced as Aishwarya Rai Bachchan
“मी अभिषेक बच्चनशी…”, ‘ऐश्वर्या राय बच्चन’ अशी ओळख करून दिल्यावर अभिनेत्रीने केलेलं वक्तव्य
Vaibhav Chavan
“अंकिता आणि आमचे दाजी…”, वैभव चव्हाणने ‘कोकण हार्टेड गर्ल’बरोबरचे शेअर केले फोटो; नेटकरी म्हणाले, “विश्वास बसत नाही…”
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Kamal Haasan said Sarika would be upset if he offered her money
“मला ती आवडली होती, पण..”, कमल हासन यांनी सारिकाबद्दल केलेलं वक्तव्य; म्हणालेले, “तिला खूप अपमानास्पद…”
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही

“नाट्यगृहांबद्दल ज्यांनी काम करायला हवं ते काम करत नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. अनेकदा आमचे प्रयोग रद्द केले जातात, कारण शासनाचा कार्यक्रम असतो. महिना, दीड महिना आधी तारीख घेतलेली असते. पण तीन दिवस आधी रद्द असं सांगितलं जातं. तिथे नाटकाला, कलाकारांना, त्यांच्या कलेला काहीही महत्त्व नाही.” असेही तो म्हणाला.

“शासनाचा कार्यक्रम ठरलाय, प्रयोग रद्द. तुम्ही तुमचं बघा. यानंतर मग बुकिंग रद्द होतात. निर्मात्यांना नुकसान होतं, यांसारख्या अनेक गोष्टी होतात. तुम्ही शासनाच्या कार्यक्रमांसाठी ही नाट्यगृह वापरत आहात ना, मग ती चांगल्या सुस्थितीत ठेवण्याची जबाबदारीही कोणीतरी उचलली पाहिजे, जी जबाबदारी कोणीही घेताना दिसत आहे. त्यांच्यासाठी ते तीन तास महत्त्वाचे असतात. ते तीन तास जेव्हा ते तिकडे असतात, तेव्हा बाहेर व्हॅनिटी व्हॅन असतात, त्यामुळे त्यांना ग्रीन रुममध्ये बघावंचं लागत नाही. त्यांच्यासाठी वेगळ्या सुखसोयी असतात. त्यात सुधारणाच होत नाही. मी याबद्दल अनेकदा बोललो आहे, लिहिलं आहे. पण त्यात काहीही बदल होत नाही”, असे सुयश टिळकने सांगितले.

आणखी वाचा : ‘बाईपण भारी देवा’ने मोडला बॉक्स ऑफिस रेकॉर्ड, कमाई पाहून केदार शिंदे म्हणाले, “तब्बल २१ वर्ष…”

दरम्यान सुयशने त्याच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘का रे दुरावा’, ‘दुर्वा’, ‘पुढचं पाऊल’, ‘बंध रेशमाचे’ यांसारख्या मालिकांमधील त्याच्या भूमिका प्रचंड गाजल्या. सध्या तो ‘मी स्वरा आणि ती दोघं’ या नाटकात काम करत आहे.