मराठी अभिनेत्यांच्या यादीतील टॉप १० अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुयश टिळक. त्याने आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकांबरोबरच तो नाट्यक्षेत्रातही प्रचंड सक्रीय असतो. सध्या तो ‘मी स्वरा आणि ती दोघं’ या नाटकात काम करत आहे. नुकतंच त्याने नाट्यगृहांच्या दुरावस्थेबद्दल भाष्य केले आहे.

सुयश टिळक हा कायमच त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. सुयश टिळकने नुकतंच ‘मित्र म्हणे’ या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. यावेळी त्याला नाट्यगृहांच्या सध्याच्या दुरावस्थेबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने नाट्यगृहांची परिस्थिती, प्रयोग करताना येणाऱ्या अडचणी, स्वच्छतागृह, मेकअप रुम यांच्या दुरावस्थेबद्दल सांगितले.
आणखी वाचा : “…तर मी दोन मुलांची आई असते”, केतकी चितळेच्या पोस्टने वेधलं लक्ष, म्हणाली “वयाच्या चौथ्या वर्षी…”

aishwarya rai and abhishek bachchan
“सेटवर आम्ही कधीच त्यांना…”, ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनबाबत अभिनेता म्हणाला, “त्यांच्या नात्यामुळे…”
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Marathi Actors Akshay Kelkar First Reaction after announced abeer gulal serial will off air
‘अबीर गुलाल’ मालिका बंद होणार असल्याचं कळताच अक्षय केळकरला बसला धक्का, म्हणाला, “मला पुन्हा स्ट्रगल…”
Maha Vikas Aghadi And Mahayuti Battle For Votes
अग्रलेख : गॅरंट्यांचा शाम्पू!
ajay devgan and aamir khan
‘इश्क’च्या शूटिंगवेळी चिपांझीने केलेला हल्ला; ‘वाचवा, वाचवा’ म्हणत आमिर खान ओरडला अन् अजय देवगणने धावत्या कारमधून…
Tula Shikvin Changlach Dhada
भुवनेश्वरी आणि चारुलताच्या गोंधळात अक्षराच वेडी ठरणार; नेटकरी म्हणाले, “शिक्षिका असून सुद्धा…”
Sachin Pilgaonkar
नवरा माझा नवसाचा २’ने थिएटरमध्ये ५० दिवस पूर्ण केल्यानंतर श्रियाची सचिन पिळगांवकरांसाठी खास पोस्ट; म्हणाली, “रॉकस्टार मला…”
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

यावेळी तो म्हणाला, “नाट्यगृहाच्या सध्याच्या दुरावस्थेबद्दल अनेकदा तक्रार करुन झाल्या आहेत. जर तू महाराष्ट्रातील नाट्यगृहांमध्ये गेलास तर तिथे माझ्या नावाने लिहिलेलं तक्रार पत्र तुम्हाला नक्कीच सापडेल. कारण मी अनेकदा प्रयोग झाल्यानंतर त्या कार्यालयात जाऊन लेखी तक्रार नोंदवतो.”

आणखी वाचा : “ज्येष्ठ कलाकारांना पुरस्कार सोहळ्यात बसायला जागा नव्हती, पण इन्फ्लुएन्सरला…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाला “जे इतकी वर्ष…”

“आता तर खूप वाईट अवस्था आहे. पुणे, मुंबई सारख्या शहरात जिथे नाटकाचे प्रयोग सर्वात जास्त होतात, तिथल्या नाट्यगृहांमध्ये लाईट्सची व्यवस्था नाही. ज्या ठिकाणी प्रयोग सादर केला जातो, तिथे असलेल्या फळ्या उखडलेल्या आहेत. अनेकदा आम्हाला लाईट्स स्वत: घेऊन जावे लागतात. ते लाईट्स घेऊन गेलो तरीही ते वर लावण्याची सोय नाही. काही ठिकाण तर सॉकेट गेलेले आहेत. वायरिंग खराब झालेलं आहे. एसीची अनेक ठिकाणी बोंब आहे. अनेकदा घामाने पूर्ण भिजलेलो असताना त्या अवस्थेत आम्हाला शो करावा लागतो.” असेही तो म्हणाला.

आणखी वाचा : Video : प्रिया मराठेचा ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिकेला रामराम, कारण सांगत म्हणाली “ही भूमिका…”

“मेकअप रुममध्ये अजूनच वेगळी अवस्था आहे. मला हे सांगायला अत्यंत वाईट वाटतं की, महाराष्ट्रात जिथे नाट्यगृह मोठ्या प्रमाणात आहे. तिथे नाटकाचा एक ठराविक प्रेक्षकवर्ग अनेक वर्ष येत आहे. त्या ठिकाणाच्या नाट्यगृहाची ही अवस्था आहे.

टॉयलेट खराब आहेत. तुम्ही उभंही राहू शकत नाही, अशी अवस्था शौचालयांची झाली आहे. मेकअपरुममध्ये बसायच्या खुर्च्या तुटलेल्या असतात. तिथे बसायची सोय नसते. तिकडचे लाईट्स चालू नसतात. पुरुषांचं एकवेळ ठिक आहे. ते समजून घेतात. पण स्त्रियांना तर याचा प्रचंड मनस्ताप होतो. त्यांना व्हिआयपी रुमदेखील कित्येकदा दिल्या जात नाहीत. अशावेळी स्वत:ची समजूत काढून प्रयोग करत राहायचं”, अशी खंतही सुयशने बोलून दाखवली.