मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता स्वप्निल जोशी हा नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. सध्या स्वप्निल हा तू तेव्हा तशी या मराठी मालिकेत काम करताना दिसत आहे. स्वप्निल जोशी हा त्याच्या अभिनयासोबत फॅमिली मॅन म्हणूनही ओळखला जातो. तो कामासोबतच त्याच्या कुटुंबालाही तितकाच वेळ देण्याचा प्रयत्न करतो. स्वप्निलची लाडकी लेक मायराचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने त्याने एक गोड व्हिडीओ शेअर केला आहे.
स्वप्निल जोशी हा ट्विटरवर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने मायराच्या वाढदिवसानिमित्त एक छान व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला स्वप्निल हा तिच्या मुलीच्या जन्माबद्दल काही किस्से सांगताना दिसत आहे. यावेळी तो भावूक झाल्याचेही पाहायला मिळत आहे.
“महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी आलं पाहिजे असं राज ठाकरेंनी मला सांगितलं होतं, पण…” : जॅकी श्रॉफ
“मला आठवतंय माझी मुलगी मायरा हिला जेव्हा मी पहिल्यांदा तिला माझ्या हातात घेतलं. जेव्हा पहिल्यांदा डॉक्टरांनी तिला माझ्याकडे दिलं आणि मी तिच्या डोळ्यात डोळे घालून बघितलं, तेव्हा मला असं वाटतं की तो माझ्या सुखाचा शुभारंभ होता”, असे त्याने या व्हिडीओत म्हटलं आहे. यासोबतच त्याने मायराचे काही जुने आणि नवीन व्हिडीओ एकत्र केले आहे.
“पिझ्झा खाण्यापेक्षा भाकरी खा”, आशा भोसले यांचा महिलांसाठी कानमंत्र
स्वप्निल जोशी सध्या ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वप्निल जोशीसोबत या मालिकेत शिल्पा तुळसकर प्रमुख भूमिकेत आहे. सध्या स्वप्नील झी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमाचा देखील एक अविभाज्य हिस्सा आहे. तू तेव्हा तशी या मालिकेत स्वप्निल जोशी हा सौरभ पटवर्धनच्या भूमिकेत तर अनामिका दीक्षितच्या भूमिकेत शिल्पा तुळसकर दिसणार आहेत.