स्वप्निल जोशी हा मराठी मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जातो. नाटक, मालिका, चित्रपट, वेबसीरिज अशा विविध माध्यमात त्याने आतापर्यंत काम केलं आहे. मराठी मनोरंजनसृष्टीतील ‘चॉकलेट हिरो’ म्हणून तो प्रसिद्ध आहे. स्वप्निल जोशीने नुकतंच एक ट्वीट केले आहे. पण या ट्वीटमुळे तो ट्रोल झाला आहे.
अभिनेता स्वप्निल जोशी हा सध्या त्याच्या ‘वाळवी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच स्वप्निल जोशीने रितेश देशमुखचा वेड हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्याने हा चित्रपट त्याला कसा वाटला, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
आणखी वाचा : स्वप्निल जोशीने ‘वेड’साठी केलेल्या ट्वीटवर जिनिलियाची मराठीत कमेंट, म्हणाली “तुमच्या…”
“वेड” आज BO वर ५० कोटीचा गल्ला पार करेल ! केवळ क. मा. ल. कामगिरी ! मराठी पाउल पाढते पुढे! मनापासून अभिनंदन. रितेश भाऊ, जिनिलीया वैनी आणि पूर्ण टीम!, असे ट्वीट स्वप्निल जोशीने केले आहे. मात्र त्याच्या या ट्वीटमध्ये त्याने मराठीतील काही शब्द चुकवल्याने तो ट्रोल झाला आहे.
स्वप्निल जोशीने या ट्वीटवर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटलं की, “वहिनी not वैनी रे, म्हणून मराठीत बोला आणि मराठी SRK cha बालिश ढोंग करू नका.” तर एकाने आधी “मराठी व्यवस्थित लिहा, असा सल्ला दिला आहे. त्याबरोबर त्याने पाढते? वैनी? पाउल?” असे शब्द लिहिले आहेत.
तर एकजण म्हणाला, “वैनी नाही रे वहिनी.” तर एकाने “अरे कसली भाषा तुमची.. वहिनी असं असतं ते.. म्हणे मी पुण्याचा..”, असे कमेंट केली आहे.
आणखी वाचा : Video : प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराववर भडकली तेजस्विनी पंडित, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
दरम्यान स्वप्निल जोशीने केलेल्या या ट्वीटमध्ये त्याने तीन मराठी शब्द चुकीचे लिहिले आहेत. पाढते, वैनी, पाउल, हे तीन शब्द स्वप्निलने चुकवले आहेत. त्यामुळे अनेक नेटकरी त्याला ट्रोल करताना दिसत आहे.