अभिनेता स्वप्नील जोशी गेली अनेकवर्ष मनोरंजन क्षेत्रात कार्यरत आहे. हिंदी मराठी या दोन्ही भाषेत त्याने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. आजवर त्याने अनेक भूमिका साकारल्या आहेत. मराठीतला रोमँटिक हिरो म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. तसेच मराठीतला शाहरुख खान अशी ही त्याची ओळख आहे. यावरच त्याने एका मुलाखतीत भाष्य केलं आहे.
स्वप्नील जोशीने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरवात केली आहे. त्यानंतर हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत त्याने काम केले आहे. मराठी चित्रपटांमध्ये त्याची चॉकलेट बॉय म्हणून ओळख आहे. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत तो असं म्हणाला, “मी नम्रपणे सांगू इच्छितो मला माझी ओळख स्वप्नील जोशी म्हणूनच हवी आहे, इतर कोणाच्या नावाने नको. कारण मी खूप कष्ट करून इथवर पोहचलो आहे.” अशा शब्दात त्याने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
स्वप्नील जोशी सध्या ‘चला हवा येऊ द्या’ आणि ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेतून आपल्या भेटीस येतो. लवकरच तो आता ‘वाळवी’ या मराठी चित्रपटात झळकणार आहे, या चित्रपटात त्याच्याबरोबर सुबोध भावेदेखील असणार आहे.