गेल्या काही दिवसांपासून सिनेसृष्टीतील वातावरण चांगलंच तापलं आहे. अनेक बॉलिवूड चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सतत कोणत्या ना कोणत्या चित्रपटाला बॉयकॉट केले जात आहे. तर दुसरीकडे प्रेक्षकही बॉलिवूड चित्रपटांकडे पाठ फिरवत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आमिर खानचा ‘लाल सिंग चड्ढा’, अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ या दोन्हीही चित्रपटांना याचा मोठा फटका बसला. अनेक कलाकारांनी या प्रकरणी पोस्ट शेअर करत त्यांना पाठिंबा दिला आहे. नुकतंच मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय अशी ओळख असणारा स्वप्निल जोशी याने या वादात उडी घेतली आहे.
स्वप्निल जोशी हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. नुकतंच त्याने त्याच्या फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवरुन तो चांगलाच चर्चेत आला आहे. या फोटोत स्वप्निल जोशी, अभिनेता रणवीर सिंग, अर्जुन कपूर हे तिघेजण दिसत आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन दिले आहे. त्याच्या या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आणखी वाचा : श्रेयस तळपदे ते स्वप्नील जोशी, मराठी टीव्हीविश्वातील सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार कोण?
रणवीर आणि अर्जुनसोबतचा फोटो शेअर करत स्वप्निल जोशी म्हणाला, “सोपी, वास्तविक आणि जादुई… तुम्ही लोक जी कोणी आहात त्याचं कारण तुम्हीच आहात… खऱ्या अर्थाने सुपरस्टार… अर्जुन कपूर आणि रणवीर सिंग तुमच्या प्रेमासाठी धन्यवाद.” स्वप्निल जोशीची ही पोस्ट काही क्षणात व्हायरल झाली आहे.
आणखी वाचा : “मी माझ्या मुलीला पहिल्यांदा हातात घेतलं तेव्हा…”, स्वप्निल जोशीने सांगितला किस्सा
त्याच्या या पोस्टमुळे त्याने नेटकऱ्यांचा रोष ओढवून घेतला आहे. स्वप्निल जोशीच्या या पोस्टमुळे त्याला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. यावर अनेक नेटकरी जोरदार कमेंट्स करत आहेत. अनेकांनी त्याच्या या पोस्टवर कमेंट करत तुलाही बॉयकॉट व्हायचं का? असा प्रश्न विचारला आहे. तर एकाने जी इंडस्ट्री तुम्हाला उभी करते तिथेच तुम्ही असे वागता असे म्हटले आहे.