‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने काल साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला. या साखरपुड्यानंतर त्या दोघांचेही अनेक व्हिडीओ चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतंच हार्दिकने त्याच्या सोशल मीडियाद्वारे आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
अभिनेता हार्दिक जोशी याने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत तो आणि अक्षया दोघेही एका गाण्यावर छान कपल डान्स करताना दिसत आहे. त्यासोबतच या व्हिडीओत ते दोघेही फार गोड दिसत आहे.
Video : राणादा- पाठकबाईंचा दणक्यात साखरपुडा, एकमेकांना अंगठी घालतानाचा व्हिडीओ व्हायरल
या व्हिडीओच्या सुरुवातीला ते दोघेही छान हातात हात घालून एंट्री घेताना दिसत आहे. त्यानंतर ते दोघेही एका गाण्यावर कपल डान्स करत आहेत. यानंतर ते दोघेही एकमेकांच्या बोटात अंगठी घालताना दिसत आहे. तसेच ते छान हसत हसत फोटो काढतानाही पाहायला मिळत आहे. त्या दोघांचा हा व्हिडीओ काही तासांपूर्वी शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना त्यांनी फक्त हार्ट इमोजी शेअर केला आहे. या व्हिडीओत ते दोघेही फार आनंदात असल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले होते. यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला आहे. याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं होते.
शुभमंगल सावधान! अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर विराजस कुलकर्णी- शिवानी अडकले विवाहबंधनात
हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांच्या साखरपुडा केल्याच्या बातमीने चाहत्यांनाही सुखद धक्का बसला आहे. त्यांच्या या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्यांसह अनेक मराठी सेलिब्रेटी कमेंट करताना दिसत आहे. यात अनेकांनी त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.