वसंत ऋतुच्या आगमनानंतर येणारा सण म्हणजे गुढीपाडवा. कलाकार मंडळीसुद्धा या खास सणाचं आनंदाने स्वागत करत आहेत. स्टार प्रवाहच्या मालिकांमधील कलाकारांनी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देत खास आठवणी शेअर केल्या आहेत.

१. आशुतोष कुलकर्णी (मालिका- साथ दे तू मला)

Tula Shikvin Changalach Dhada akshara is pregnant
अक्षराच्या प्रेग्नन्सीबद्दल अधिपती अनभिज्ञ! भुवनेश्वरी खेळणार मोठा डाव…; ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेत पुढे काय घडणार?
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
yogita chavan troll for celebrating christmas
ख्रिसमस सेलिब्रेशनमुळे योगिता चव्हाण ट्रोल; पती सौरभ सडेतोड उत्तर देत म्हणाला, “मराठी भाषेचा, संस्कृतीचा प्रचार…”
deepika padukone ranveer singh christmas celebration with baby Dua
Christmas 2024: वरुण धवनने पहिल्यांदाच शेअर केला ६ महिन्यांच्या लेकीचा फोटो; दीपिका-रणवीरने मुलीसह ‘असं’ केलं सेलिब्रेशन
Maharashtrachi Hasya Jatra Fame Onkar Raut
“आपल्या सणांचे फोटो कधी टाकलेस…”, विचारणाऱ्या नेटकऱ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याचं स्पष्ट उत्तर; म्हणाला…
Titeeksha Tawde
Video: मालिका संपल्यानंतर कलाकार पुन्हा आले एकत्र; तितीक्षा तावडेने शेअर केला व्हिडीओ, नेटकरी म्हणाले…
janhvhi kapoor share her paintings
जान्हवी कपूर आहे उत्कृष्ट चित्रकार, रेखाटलं सुंदर चित्र; तुम्हालाही काढायचं आहे? जाणून घ्या तज्ज्ञांच्या टिप्स
Kedar shinde suraj Chavan jhapuk jhupuk movie muhurta photos viral
केदार शिंदे दिग्दर्शित ‘झापुक झुपूक’ चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, सूरज चव्हाणसह मालिकाविश्वातील ‘हे’ लोकप्रिय चेहरे झळकणार

मी मूळचा पुण्याचा असल्यामुळे गुढीपाडव्याची विशेष आठवण आहे. माझ्या जुन्या घराला बाल्कनी नसल्यामुळे गुढी उभारताना फार कसरत करावी लागे. त्यामुळे नवं घर घेताना आवर्जून मी बाल्कनी असणारं घर घेतलं आणि तेव्हापासून जल्लोषात गुढी उभारली जाते. मला लहानपणी गुढीला घातल्या जाणाऱ्या बत्ताश्यांच्या माळा खायला फार आवडायचं. आता डाएटमुळे शक्य होत नाही. पण शूटिंग नसेल तर आवर्जून मी पुण्याला जाऊन आई-बाबांसोबत उत्साहात हा सण साजरा करतो.

२. संकेत पाठक (मालिका- छत्रीवाली)

गेली अनेक वर्ष मी शूटिंगच्या निमित्ताने मुंबईत असल्यामुळे सेटवरच गुढीपाडवा सेलिब्रेट करतोय. मी नाशिकचा असल्यामुळे माझ्या घरी गुढी दरवर्षी उभारली जाते. लहानपणी मी माझी वेगळी छोटी गुढी उभारायचो. त्या छोट्या गुढीचे छोटे दागिने, छोटी साडी हे साकारताना खुप मजा यायची. गुढीपाडव्याला आमच्याकडे गुळ-पोळीचा खास बेत असतो. आईच्या हातचा हा खास पदार्थ मी खूप मिस करतो.

३. भार्गवी चिरमुले (मालिका- मोलकरीण बाई)

माझी बहिण चैत्रालीचा गुढीपाडव्याला तिथीनुसार वाढदिवस असतो. त्यामुळे आमच्या घरात डबल सेलिब्रेशन असतं. गुढी उभारण्याची धावपळ आणि सोबतीला वाढदिवसाचं सेलिब्रेशन अशी धमाल दरवर्षी आमच्या घरी असते. खास बात म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवसापासून आमच्या घरी आंबा खायला सुरुवात होते. आमरस-पुरीचा खास बेत यादिवशी असतो. साडी नेसून अगदी पारंपरिक पद्धतीने आम्ही यादिवशी सहकुटुंब गुढीची पूजा करतो. त्यामुळे यादिवसाची खूप खास आठवण आहे माझी.

४. गौरव घाटणेकर ( मालिका – ललित २०५)

गुढीपाडव्याची खास आठवण सांगायची तर मी स्टार प्रवाहसोबत अटेण्ड केलेली गिरगावची भव्यदिव्य शोभायात्रा. ढोल-ताश्यांचा गजर, पारंपरिक वेशभुषेमध्ये सामील झालेले हजारो लोक हे संपूर्ण वातावरणच खूप भारावून टाकणारं होतं. माझ्या आयुष्यातली ही एक अविस्मरणीय आठवण आहे. यंदा मी आणि माझी पत्नी श्रुती पहिला पाडवा साजरा करणार आहोत. गेल्यावर्षी शूटिंगमुळे गुढीपाडवा एकत्र साजरा करणं जमलं नाही. यंदा मात्र आधीच प्लॅनिंग करुन ठेवलंय. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा स्पेशल असणार आहे. शिवाय स्टार प्रवाहवरच्या ‘ललित २०५’मध्येही गुढीपाडव्याचं खास सेलिब्रेशन पाहायला मिळणार आहे.

५. प्रिया मराठे (साथ दे तू मला)

मी पक्की ठाणेकर आहे. त्यामुळे लहानपणापासून ठाण्यात साजरा होणारा गुढीपाडवा पाहात आलेय. पहाटे निघणाऱ्या शोभायात्रा, भल्यामोठ्या रांगोळ्या, दिव्यांची आरास आणि दिमाखात झळकणारी गुढी या साऱ्या गोष्टी कायम स्मरणात राहणाऱ्या आहेत. यंदाचा गुढीपाडवा यासाठी स्पेशल आहे कारण गेल्याच वर्षी मीरारोडमध्ये बॉम्बे फ्राईज या आमच्या हॉटेलची सुरुवात झाली. यंदा एका खास मराठमोळ्या गोड मेन्यूसह आम्ही हॉटेलमध्ये गुढी उभारणार आहोत. त्यामुळे यंदाचा गुढीपाडवा मी आणि शंतनू जल्लोषात साजरा करणार आहोत.

 

Story img Loader