मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. सध्या ती झी मराठीवरील तू तेव्हा तशी या मालिकेत वल्ली ही भूमिका साकारत आहे. तिच्या या भूमिकेला चाहत्यांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. नुकतंच अभिज्ञा भावे ही तिचा पती मेहुल पै सोबत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमात सहभागी झाली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत अभिज्ञा भावे ही तिच्या पतीसोबत चला हवा येऊ द्या मध्ये सहभागी झाल्याचे पाहायला मिळत आहे. यावेळी चला हवा येऊ द्याची टीम त्यांना विविध प्रश्न विचारताना दिसत आहे. यावेळी सूत्रसंचालक निलेश साबळेने मेहुलला अभिज्ञाबद्दल एक प्रश्न विचारला. ‘अभिज्ञाची आवडती मैत्रीण कोणती?’ असा प्रश्न निलेश साबळेने मेहुलला विचारला. त्यावर स्वप्निल जोशी या उत्तरावर श्रेया बुगडे इतकी चिडणार आहे, असे गमतीत म्हणतो.
“दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत

Image Of Supriya Sule And Ajit Pawar
Supriya Sule : “मी बोलते, पण अजित पवार माझ्याशी…”, पवार कुटुंबीयांतील दुराव्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Tharla Tar Mag Maha Episode Promo sayali confess love
“तुमच्यावर खूप प्रेम…”, अखेर सायलीने दिली प्रेमाची कबुली! ‘ठरलं तर मग’ मालिकेत मोठा ट्विस्ट, नेमकं काय घडलं? पाहा प्रोमो
Woman dies by suicide, family alleges harassment by husband over English skills
“इंग्रजी बोलता येत नाही, नवऱ्याला शोभत नाहीस”, सासरच्या छळाला कंटाळली; विवाहितेचा घरात आढळला मृतदेह, नेमकं काय घडलं?
Hrishikesh Shelar
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’फेम अभिनेत्याने प्रियदर्शन जाधव, विशाखा सुभेदार यांच्याबरोबर काम करण्याचा सांगितला अनुभव, म्हणाला…
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
What Suresh Dhas Said About Munni?
Suresh Dhas : सुरेश धस यांचं वक्तव्य; “मुन्नी म्हणजे राष्ट्रवादीतला एक पुरुष, त्या मुन्नीने कुठेही चर्चेला यावं, मी…”
Representative Image
“मी अभ्यास करू शकत नाही, हे माझ्या आवाक्याबाहेर…” कोटामध्ये IIT प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या

यानंतर निलेश साबळेही ‘श्रेया आहे का इथे’ असे बोलताच ‘अभिज्ञा असू दे ना, नाही बघत आहे तर..’, असे म्हणते. यानतंर कुशल बद्रिके मेहुलला त्या चार जणींपैकी एक आहे असे सांगतो. त्यावर मेहुल पटकन अनुजा साठेचं नाव घेतो आणि ते उत्तर चुकलेले असतं. या प्रश्नाचे उत्तर जॅकलिन फर्नांडिस असे असते.

अभिज्ञाने तिची सर्वात आवडती मैत्रीण म्हणून बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे नाव घेते. ती तिची आवडती मैत्रीण का आहे, याचे पुढे ती स्पष्टीकरणही देताना दिसत आहे. यावर ती म्हणते की “मी लग्नानंतर एकदा मेहुलला विचारले होते की बायको म्हणून मला कोणत्या व्यक्तीकडून धोका असेल. त्यावर त्याने मला जॅकलिन फर्नांडिस असे उत्तर दिले. त्यामुळे मी तिला मैत्रीण बनवली, मग ती आता माझी सवत होणार नाही.” अभिज्ञाच्या या उत्तरावर सर्वजण जोरजोरात हसू लागतात.

“माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

दरम्यान अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. जवळपास १५ वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखायचे. पण कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला. यानंतर काही दिवसांनी ते दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानतंर ६ जानेवारी २०२१ रोजी त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच मेहुलला कर्करोगाचं निदान झालं. गेल्या काही दिवसांपासून तो रुग्णालयात उपचार घेतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Story img Loader