मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून अभिज्ञा भावेला ओळखले जाते. अभिज्ञा ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती अनेकदा तिचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. अभिज्ञा भावे ही गेल्या वर्षाच्या सुरुवातीलाच मेहुल पै सोबत लग्नबंधनात अडकली. पण सध्या मेहुल हा कर्करोगाशी झुंज देत आहे. नुकतंच मेहुलने याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे.

मेहुलने नुकतंच त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अभिज्ञासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अभिज्ञा आणि तो एका रुग्णालयात असल्याचे दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अभिज्ञा ही मेहुलच्या डोक्यावर किस करताना दिसत आहे. या फोटोला कॅप्शन देताना ते म्हणाले, “मला माझ्या आयुष्यात अनेक मूर्ख लोक भेटले आहेत. पण कर्करोग हा त्यापैकी सर्वात मोठा आहे… माफ करा मला…C…तू चुकीच्या व्यक्तीला निवडलं आहेस.”

Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Manmohan Sing Death : मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया, “माझे आदर्श आणि मार्गदर्शक..”
prarthana behere shares emotional post as demise of her brother
“तू अचानक निघून गेलास…”, जवळच्या व्यक्तीच्या निधनानंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरेची भावुक पोस्ट
two sons of a mother joined the army together
मायबापाच्या कष्टाचं फळ! दोन्ही मुले एकाच वेळी रूजू झाले भारतीय सैन्यात, VIDEO होतोय व्हायरल
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
monali thakur leave the live concert
Video : प्रसिद्ध गायिकेने ‘या’ कारणामुळे अर्ध्यावर सोडला वाराणसीमधील कॉन्सर्ट, चाहत्यांची माफी मागत म्हणाली; “बेजबाबदार लोकांवर…”

मेहुल पै ने शेअर केलेला रुग्णालयातील फोटो पाहून तो कॅन्सरची झुंज देत असल्याचे दिसत आहे. त्याच्या या पोस्टवर अनेक कलाकारांनी तो लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे. अभिज्ञाची जवळची मैत्रीण अभिनेत्री मयुरी देशमुखनेही यावर कमेंट करत तिला धीर दिला आहे. तू रॉकस्टार आहेस..तू ही लढाई नक्की जिंकणार… असे मयुरी देशमुख म्हणाली.

“माफ करा मला…”, कर्करोगाशी झुंज देणाऱ्या अभिज्ञा भावेच्या पतीची भावनिक पोस्ट

अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. जवळपास १५ वर्षांपासून ते दोघे एकमेकांना ओळखायचे. पण कॉलेजनंतर त्यांचे संपर्क तुटला. यानंतर काही दिवसांनी ते दोघेही पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रुपांतर झाले. त्यानतंर ६ जानेवारी २०२१ रोजी त्या दोघांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर वर्षभरातच मेहुलला कर्करोगाचं निदान झालं आहे. सध्या मेहुल हा रुग्णालयात उपचार घेत आहे.

Story img Loader