९०च्या दशकातील मराठमोळे लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांना ओळखले जाते. गेल्या अनेक वर्षांपासून विविध मालिका, नाटक आणि चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. आता अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांचा मुलगाही सिनेसृष्टीत पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांचा मुलगा अमेय नारकर लवकरच एका व्यावसायिक नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणार आहे. ऐश्वर्या नारकर यांनी नुकतंच एक पोस्ट शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.
आणखी वाचा : “खरी शिवसेना कोणाची? शिंदेंची की ठाकरेंची?”; अभिजीत बिचुकले म्हणाला “शिवरायांचं नाव असेल तर…”

Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
devara public review
Devara Public Review: प्रेक्षकांना कसा वाटला ‘देवरा: पार्ट १’चित्रपट? प्रतिक्रिया देत म्हणाले, “दिग्दर्शन खूपच….”
Singer Dhvani Bhanushali acting debut
गायिका ध्वनी भानुशालीचे अभिनय क्षेत्रात पदार्पण
shinde shiv sena activist throwing currency notes in anand ashram video viral on social media
आनंद दिघे यांच्या आश्रमात नोटांची उधळण; समाजमध्यमांवर चित्रफीत प्रसारित,ठाकरे गटाची शिंदे गटावर टीका
career journey of actor james earl jones
व्यक्तिवेध : जेम्स अर्ल जोन्स
Dilip Halyal, comedian Dilip Halyal,
ज्येष्ठ हास्य कलाकार दिलीप हल्याळ यांचे निधन
article about veteran film critic and author aruna vasudev
व्यक्तिवेध : अरुणा वासुदेव

आजकल प्रस्तुत ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. टॉम स्टॉपार्ड यांच्या द रिअल इन्स्पेक्टर हाऊंड या एकांकिकेवर आधारित हे नाटक आहे. या नाटकाचे दिग्दर्शन अमेय नारकर करत आहे.

अमेय नारकर आणि चिन्मय देव यांनी याचे मराठीत भाषांतर केले आहे. ऋषिकेश कळसकर, निखिल पाटील, ईशा संजय, समृद्धी दंडगे, विशाल वांगेकर, संकेत जगदाळे, चिन्मय देव , संतोष नाईक यांनी या नाटकातून महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. येत्या रविवारी १७ सप्टेंबरला भरत नाट्य मंदिर पुणे येथे या नाटकाचा पहिला प्रयोग रंगणार आहे.

आणखी वाचा : Video : प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आजही राहते चाळीत, गिरगावातील घराजवळ तीन थर लावत फोडली दहीहंडी

दरम्यान अमेय नारकर हा लहानपणापासूनच कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. त्याला नृत्याची देखील विशेष आवड आहे. रुईया कॉलेजमध्ये शिकत असताना तो विविध नाटकातही का मकरायचा. त्याने विविध नाट्यस्पर्धांमधून सहभाग दर्शवला आहे.