मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल आणि प्रिया बेर्डे चर्चेत आहेत. एका प्रकरणात उच्च न्यायालयाने अलका कुबल आणि प्रिया बेर्डेंसह इतर चार जणांना १० लाख भरण्याचे आदेश दिले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, अखिल भारतीय चित्रपट मंडळाच्या माजी संचालकांना उच्च न्यायालयाने १० लाख भरण्याचे आदेश दिले आहेत. प्रसाद सुर्वे, विजय पाटकर, विजय कोंडके या माजी अध्यक्षांसह अलका कुबल, प्रिया बेर्डे, व्यवस्थापक रवींद्र बोरगावकर यांच्यासह तत्कालीन संचालकांना १० लाख ७८ हजार रुपये जमा करण्यास सांगितले आहे. सहा आठवड्यांत १० लाख ७८ हजार रुपये भरण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा
नेमकं प्रकरण काय?
पुण्यात २०१२ साली अखिल भारतीय चित्रपट मंडळाकडून ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी ५२ लाख रुपये खर्च करण्यात आले होते. ‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमासाठी करण्यात आलेल्या खर्चावर कोल्हापूर येथील काही सभासदांनी आक्षेप घेतला होता. त्यांनी धर्मादाय आयुक्त यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. धर्मादाय आयुक्तांनीही तत्कालीन संचालकांना रक्कम भरण्याचे आदेश दिले होते. परंतु, तांत्रिक(टंकलेखनाची) चूक झाल्याचे सांगत त्यांनी रक्कम भरली नव्हती.
हेही वाचा >> Video : अमृता खानविलकरसह ‘डोला रो डोला’ गाण्यावर थिरकली माधुरी दीक्षित, करण जोहर म्हणाला…
महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला. त्यानंतर धर्मादायुक्तांनी टंकलेखनाची चूक सुधारून नव्याने आदेश काढून रक्कम भरण्यास सांगितले होते. परंतु नंतर या संचालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर आता उच्च न्यायालयानेही त्यांना १० लाख ७८ हजार ही रक्कम न्यायालयात जमा करावी, असे आदेश दिले आहेत.
हेही पाहा >> Photos : ‘सैराट’मधील आर्चीचं खरं नाव माहीत आहे का? रिंकू नाही तर…
दरम्यान या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झालेली नाही. १५ ऑक्टोबरला या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे. सुनावणी होण्यापूर्वी ही रक्कम जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.