मराठीतील सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री म्हणून अमृता खानविलकरला ओळखले जाते. उत्तम अभिनय, कमालीचा डान्स आणि प्रत्येक भूमिकेला न्याय देणारी अभिनेत्री म्हणून तिची खास ओळख आहे. मराठी सिनेसृष्टीत अमृताचं नाव जितकं चर्चेत असतं तितकीच तिच्या नावाची बॉलिवूडमध्येही चर्चा असते. सध्या अमृता ही झलक दिखला जा असते. अमृताने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट, मालिका, वेबसीरीजमध्ये काम केले आहे. अमृताचा येत्या नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असतो. या निमित्ताने तिने एक पोस्ट शेअर केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता ही इन्स्टाग्रामवर कायमच सक्रीय असते. नुकतंच अमृताने तिचा पती हिमांशू मल्होत्राबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या वाढदिवसाबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. अमृताचा वाढदिवस हा २३ नोव्हेंबरला असतो. मात्र तिच्या या पोस्टमध्ये तिने वाढदिवसाचा महिना याबद्दल सांगितले आहे.
आणखी वाचा : “ऐश्वर्या रायशी लग्न करण्यामागे तिचे सौंदर्य…” अभिषेक बच्चने सांगितले खरे कारण

अमृता खानविलकरची पोस्ट

वाढदिवसाच्या महिन्यातील पहिला दिवस…. वाढदिवस हा स्पेशल असतो, याची कधीच कल्पना नव्हती. पण मी तुला भेटले आणि त्यानंतर तू मला सगळं कसं सेलिब्रेट करायचं हे शिकवलंस. तू मला वाढदिवसाच्या एका दिवसासाठी नव्हे तर महिन्याचे संपूर्ण २३ दिवस खास असल्याची जाणीव करुन देतोस.

जेव्हा कोणी मला वाढदिवसाच्या आठवणीबद्दल विचारते तेव्हा माझ्या मनात सर्वात आधी तुझा विचार येतो. स्वत:च्या सर्व गोष्टी कशा हटके पद्धतीने साजरा करायच्या हे मला शिकवल्याबद्दल धन्यवाद. माझा वाढदिवस होता… आहे आणि तो नेहमी तुझ्याशिवाय अपूर्ण राहील, असे अमृता खानविलकरने म्हटले आहे.

आणखी वाचा : “आमच्यात वैर…” अमृता खानविलकरचा फोटो पाहताच सोनाली कुलकर्णी स्पष्टच बोलली

दरम्यान अमृता खानविलकरचा जन्म २३ नोव्हेंबर १९८४ रोजी झाला आहे. काही महिन्यांपूर्वी अमृता खानविलकरची प्रमुख भूमिका असलेला चंद्रमुखी हा चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड ब्रेक केले. ‘चंद्रमुखी’ या चित्रपटात दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणाऱ्या नृत्यांगणेची प्रमुख भूमिका साकारली होती. यामुळे तिला चांगलची प्रसिद्धी मिळाली. विश्वास पाटील यांच्या ‘चंद्रमुखी’ या कादंबरीवर आधारित या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली होती.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress amruta khanvilar share instagram post for husband her birthday month nrp