पंडित वसंतराव देशपांडे हे एक चतुरस्त्र व्यक्तिमत्व. शास्त्रीय संगीतानं नटलेली एखादी बंदिश असो, वा चित्रपटातील भावगीत असो, अथवा नाट्यगीत असो या प्रत्येक संगीत प्रकारावर वसंतरावांची गायकी आपला ठसा उमटवून जाते. वसंतरावांची सांगितिक कारकीर्द अनेकांना माहित आहे. पण ‘मी वसंतराव’ या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांचे वैयक्तिक आयुष्य, सांगितिक प्रवास प्रेक्षकांना अनुभवता येत आहे. या चित्रपटाबद्दल विविध प्रतिक्रिया समोर येत आहे. नुकतंच अभिनेत्री अनिता दाते हिने हा चित्रपट कसा वाटला? याबद्दल सांगितले आहे.
अभिनेत्री अनिता दाते ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने मी वसंतराव हा चित्रपट कसा वाटला, याबद्दलची माहिती दिली आहे. तसेच या भूमिकेतील तिच्या पात्राबद्दलही तिने सांगितले आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
अनिता दातेची फेसबुक पोस्ट
“मी वसंतराव”
“हा आमचा चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा झाला. ह्या चित्रपटात मला पंडित वसंतराव देशपांडे ह्यांच्या कणखर आई ची व्यक्तीरेखा साकारायला मिळाली. तुम्ही ह्या कामाचे, आमच्या चित्रपटाचे भरभरून कौतुक करीत आहात… तुम्हा सर्वांच्या या दिलखुलास प्रतिक्रियांसाठी मनापासून आभार!अजुनही ज्यांनी हा चित्रपट बघितलेला नाही त्यांनी नक्की बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्या पर्यंत पोहोचवा. तुमचं हे प्रेम आमचा उत्साह नेहमी वाढवत राहील. ‘मी वसंतराव’ सर्व सिनेमागृहात”, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे.
“आताही आरे मार्गे कुठेही जायची माझी हिंमत होत नाही…”, सायली संजीवने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग
जिओ स्टुडिओज प्रस्तुत ‘मी वसंतराव’ या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे. तर निपुण अविनाश धर्माधिकारी यांनी या चि्तरपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात राहुल देशपांडे हा मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. तर अभिनेत्री अनिता दाते हिने वसंतराव देशपांडेंच्या आईचे पात्र साकारलं आहे. त्यासोबतच या चित्रपटात पुष्कराज चिरपुटकर, कौमुदी वालोकर आणि अमेय वाघ यांच्याही प्रमुख भूमिका पाहायला मिळत आहेत.