सुप्रसिद्ध अभिनेत्री अश्विनी भावे या सोशल मिडीयावर चांगल्याचं सक्रिय असतात. त्यांनी त्यांच्या ग्रीन डोअर या उपक्रमा अंतर्गत आज त्यांच्या घरासमोरील अंगणात वृक्षारोपण करत वसुंधरा दिन साजरा केला आहे. त्यांनी झाडे लावतानाचा एक व्हिडीओ नुकताच सोशल मिडीयावर शेअर केला आहे. यात त्यांनी ग्रीन डोअर या उपक्रमा अंतर्गत झाडे का लावावीत आणि कशा पद्धतीने झाडांची जोपासना करावी याबद्दल माहिती दिली आहे.
अश्विनी भावे यांनी व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना वसुंधरा दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि वृक्षारोपण केलं आहे.
अश्विनी भावे यांनी अमेरीकेत त्यांच्या घरासमोरील बागेत वेगवेगळी फळं, फुलं आणि भाज्यांची बाग फुलवली आहे. त्या रोजच्या जेवनातही त्या भाज्यांचा वापर करतात. निसर्ग किती महत्त्वाचा आहे हे पटवून देण्यासाठी त्या सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्हिडीओ शेअर करतात. त्यांच्या ग्रीन डोअर या उपक्रमाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
View this post on Instagram
अश्विनी भावे यांनी ‘अशी ही बनवाबनवी’, ‘सरकारनामा’, ‘कळत नकळत’, ‘कदाचित’, ‘मांजा’ अशा एकाहून एक सुपरहीट सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.