आई या शब्दातच खूप माया आहे. माझ्या दिवसाची सुरवात तिच्यापासूनच होते. चित्रीकरणासाठी मी मुंबईत असते. सकाळी तीच मला उठवते आणि नाईट शिफ्ट असेल तर जो पर्यंत मी घरी जात नाही तोपर्यंत ती जागीच असते. दिवसातून १० कॉल तरी असतातच. वेळेत खाल्लसं का? बाहेर जाताना नीट जा.. या गोष्टी रोजच्या आहेत आणि मला सुद्धा या गोष्टीची सवय झालीये.. आपण दमून घरी आल्यावर तिनी प्रेमानी हात जरी फिरवला तरी सगळा थकवा दूर होतो.
आई ही माझी जवळची मैत्रिण आहे.. ती स्वीट हार्ट आहे माझी. माझा आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी मी तिलाच सांगते. तिची आठवण कधी येते हा प्रश्नच चुकीचा आहे. ती सतत माझ्या बरोबर असतेच.
माझी आई माझ्या साठी हिरो आहे. प्रत्येक परिस्थितीला सामोरं जाऊन त्यातून कसा मार्ग काढणे हे तीच करू शकते. मी कधी डगमगले तर तीच स्मरण पुरेस असतं , आपोआप त्यातून मार्ग सुचतो.
तिचा खूप मोठा आधार आहे मला. मी आज जिथे आहे ते फक्त माझ्या आईमुळे.. फक्त पाठिंबाच नाही तर मी कुठे डगमगतेयं असं वाटल तर तीच मला पुश करते. ती सगळ्या गोष्टींकडे खूप सकारात्मकपणे बघते. त्यातून मला खूप उर्जा मिळते पुढे जायला हिंमत मिळते आणि मला मोठे करण्यासाठी तिने अतोनात कष्ट सोसले आहेत. ती नसती तर मी आज इथपर्यंत पोचूच शकले नसते. माझ्या कामातले निर्णय आजही मी तिला विचारून घेते. कारण तिचा इतका अचूक निर्णय मला कोणीच देणारं नाही.. नातं कुठलही असलं तरी विश्वास खूप महत्त्वाचा असतो आणि या क्षेत्रात येताना माझ्यासाठी तिचा माझ्यावरचा विश्वास जास्त महत्वाचा होता.
ती स्ट्रीक्ट पण आहे आणि इनोसंट पण त्यामुळे शिस्त आणि तितकेच प्रेम या दोन्हीचा कोम्बो आहे… त्यामुळे मीही तशीच आहे… आपल्या क्षेत्रात संयम ठेवणं खूप गरजेचे असते आणि आशेवर जगात रहायचं हे मी आई काढून शिकले कि आज न उदया ती गोष्ट आपल्याला मिळतेच….

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा