या महिन्याच्या २९ आणि ३० ऑगस्ट या दोन दिवशी मराठी चित्रपट आणि मालिका यांचे चित्रीकरण होण्याची शक्यता बरीच कमी आहे. याचे कारण, २९ ऑगस्टला मुंबईत तर दुस-या दिवशी बाहेरगावी साज-या होणा-या गोपालकाल्यासाठी ब-याच मराठी तारकानी एव्हाना तारखा दिल्या आहेत. काहीजणी या मंडळाच्या व्यासपीठावर अशी ‘नाचानाच’ करण्यास सज्ज झाल्या असून एका दिवसात मुंबई-ठाणे आणि नवी मुंबई या परिसरात किमान सहा मंडळात नाचाची सुपारी घेणा-या तारकेची क्षमता जास्त मानली जात आहे. वाढत्या महागाईचा विचार करून नृत्याची एक सुपारी किमान तीस हजार रूपये ठरल्याची खबर आहे. तर काही कलाकार नृत्यापेक्षा ‘सदिच्छा भेट’ देणाचा उपक्रम पार पाडतात. एका मंडळाकडून किमान पंधरा हजार असा दर आहे. काही ‘बहुचर्चित चेह-यांना’ प्रत्येक नृत्यासाठी पन्नास हजार तर ‘दर्शन देण्यासाठी’ प्रत्येक मंडळाकडून पंचवीस हजार मिळवण्याची शक्यता आहे. अर्थात, यात सवंग अथवा वावगे असे काहीही मानले जात नाही. गोविंदाच्या गर्दीत आणि पुरूषी नजरांमध्ये बेभान नृत्यकला साकारणे एक मोठे कौशल्य आहे. तर बघ्यांच्या अफाट गर्दीतून आपल्या प्रशस्त गाडीतून अनेक स्थळाना भेट देणे हे देखिल जिकरीचे आहे. पण आपल्या लोकप्रयतेची किंमत वसूल करण्यासाठी असे कष्ट करण्याची अनेकांची तायारी आहे. गेल्या वर्षीच्या गोपालकाल्यामध्ये नेहा पेंडसे, श्रृती मराठे यानी भरपूर नाचकाम केले, यावर्षी योगिता दांडेकर, स्मिता तांबे याना जोरदार मागणी असल्याची कुजबूज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा