केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. ३० जूनला हा सिनेमा प्रदर्शित झाला असून, गेले काही दिवस चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनमध्ये व्यग्र होती. या चित्रपटाला रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यानिमित्ताने अंकुश चौधरीची पत्नी अभिनेत्री दीपा परबने नुकतीच दिग्दर्शक केदार शिंदेंसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
हेही वाचा : ‘गदर २’च्या निर्मात्यांवर अमीषा पटेलचे गंभीर आरोप; म्हणाली, “ना पगार, ना गाडी, एवढ्या समस्या…”
दीपा परब सध्या ‘झी मराठी’वरील ‘तू चाल पुढे’ या मालिकेत काम करत आहे. या मालिकेसाठी आणि ‘बाईपण भारी देवा’चित्रपटासाठी अभिनेत्रीने केदार शिंदे यांचे आभार मानले आहेत. लग्न, मुलाचा जन्म यानंतर दीपाने तब्बल १२ वर्षांनी मोठ्या पद्यावर पुनरागमन केले. याचे संपूर्ण श्रेय अभिनेत्रीने केदार शिंदेंना दिले आहे.
हेही वाचा : “आलिया एवढं बजेट नव्हतं” रणवीर सिंहने शेअर केलेला ‘तो’ व्हिडीओ चर्चेत; नेटकरी म्हणाले, “तुला पैसे…”
अभिनेत्री दीपा परबची पोस्ट
Captain of the ship… माझे भाऊजी… दिग्दर्शक केदार शिंदे
He is my Lucky Charm… मी रंगभूमीवर पदार्पण केलं त्या नाटकाचं दिग्दर्शन केदारने केलेलं आणि १२ वर्षांनी जेव्हा मी पुन्हा अभिनय क्षेत्रात परतण्याचा निर्णय घेतला तेव्हा योगायोगाने दिग्दर्शक केदार शिंदेंच्याच ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाने पुन्हा सुरुवात झाली. आणि त्यानंतर झी मराठीवरील ‘तू चाल पुढं’ सारखा सुंदर प्रोजेक्ट माझ्या नावी लिहिला गेला. नेहमीप्रमाणेच केदार पुन्हा एकदा तू मला खूप काही दिलयस… एक नवीन संधी, नवी ओळख, नवं माध्यम, प्रेक्षकांच मनमुराद प्रेम, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माई, शशी ताई, साधना, केतकी, पल्लवी सारख्या बहीणी. यासाठी मी नेहमीच तुझी ऋणी राहीन. केदार…तू असेच आणखीन नव-नवीन चांगले प्रोजेक्ट्स निर्मित आणि दिग्दर्शित करत रहा. त्यांनाही उदंड प्रतिसाद मिळो हीच स्वामीं चरणी प्रार्थना!
दरम्यान, केदार शिंदेंनी दीपाच्या या पोस्टवर तीन हार्ट इमोजी देत कमेंटमध्ये “वहिनी…हे तीन बदाम म्हणजे तू, अंकुश आणि प्रिन्स…आपण सदैव असेच राहू. श्री स्वामी समर्थ” अशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुकन्या कुलकर्णी, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, दीपा परब- चौधरी या अभिनेत्रींनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तसेच याबरोबरच अभिनेते शरद पोंक्षे, पियुष रानडे यांच्याही या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका आहेत.