छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेने काही महिन्यापूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र तरी या मालिकेतील सर्वच कलाकार कायमच चर्चेत असतात. या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे धनश्री काडगावकर. या मालिकेत धनश्रीने नंदिता गायकवाड म्हणजे वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. मात्र दीर्घकाळ या मालिकेत काम केल्यानंतर आई होणार असल्याने तिने मालिकेतून ब्रेक घेतला.
धनश्रीने काही महिन्यांपूर्वी एका गोंडस बाळाला जन्म दिला. धनश्रीने तिच्या बाळाचे नाव कबीर असे ठेवले आहे. बाळाच्या जन्मानंतर तिचे वजन फारच वाढले होते. मात्र तिने जबरदस्त मेहनत घेत वजन कमी केले आहे. धनश्री ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नुकतंच तिने तिच्या इन्स्टाग्रामवर एक रिल व्हिडीओ शेअर केला आहे. मात्र या व्हिडीओमुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
धनश्रीचा हा रिल व्हिडीओ सध्या प्रचंड ट्रेंडीगवर असल्याचे पाहायला मिळत आहे. यात तिने छान जिन्स आणि काळ्या रंगाचा टॉप परिधान केला आहे. यात ती एका गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी कमेंट केल्या आहेत. यात एकाने ‘मस्त ट्रान्सफॉर्मेशन’ असे म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने ‘लयभारी’, ‘किती बारीक झालात’, अशीही कमेंट केली आहे. तर एकाने ‘काय वाहिनी, कसला डान्स आहे तुमचा सुपर से बहुत बहुत उपर,’ असेही म्हटले आहे.
‘पुष्पा’ चित्रपटातील समांथाच्या ‘त्या’ आयटम साँगमधील पडद्यामागचा व्हिडीओ व्हायरल, म्हणाली…
पण त्याच्यासोबत काहींनी या व्हिडीओवरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे. “तुम्ही आता खूप जाड झाल्या आहात”, असे एका नेटकऱ्याने म्हटले आहे. तर एका नेटकऱ्याने “तुम्हाला नाही जमलय, हे तुम्हाला शोभत नाही,” अशी कमेंट केली आहे.