मराठी सिनेसृष्टीत चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणून हेमांगी कवीला ओळखले जाते. आपल्या रोखठोक आणि स्पष्ट मतामुळे ती कायमच चर्चेत असते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. याद्वारे ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करत असते. नुकतंच हेमांगीने तिचे नाव चुकीचे घेतल्याबद्दल खडे बोल सुनावले आहेत.
हेमांगी कवी ही फेसबुक कायमच विविध गोष्टींबद्दल पोस्ट शेअर करत असते. नुकतंच तिने तिचे काही वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर केले आहेत. त्याला कॅप्शन देताना तिने मंगेश पाडगावकरांच्या कवितेच्या ओळी लिहिल्या आहे. “शोधिले स्वप्नात मी ते ये करी जागेपणी, दाटुनी आलास तू रे आज माझ्या लोचनी, वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा, तू असा जवळी रहा – मंगेश पाडगावकर”, असे कॅप्शन तिने या फोटोला दिले आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.
आणखी वाचा : MPSC च्या परीक्षेसाठी शुभेच्छा मागणाऱ्याला हेमांगी कवीचे स्पष्ट उत्तर, म्हणाली….
या पोस्टवर कमेंट करताना एक चाहत्याने तिला बॉलिवूड ऑफरबद्दल विचारले आहे. ‘कसं काय बॉलिवूडने तुम्हाला चान्स दिला नाही, नुकसान आहे त्यांचं’, असा प्रश्न तिला एका चाहत्याने विचारला आहे. त्यावर तिनेही ‘हो ना’ असे होकारार्थी उत्तर दिले आहे. यावर कमेंट करताना एका चाहत्याने ‘अप्रतिम शुभांगी’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा : “हिला काहीच येत नाही…” स्मृती इराणींनी केला ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेच्या कास्टिंगबद्दल खुलासा
मात्र चाहत्याने चुकीचे नाव घेतलेले पाहून ती चांगलीच संतापली. यावर कमेंट करताना तिने ‘नाव समोर असतानाही कसं काय चुकू शकतं?’ असा प्रश्न विचारला आहे. तर तिच्या अनेक चाहत्यांनी तिचे नाव हेमांगी आहे, असा सल्ला त्या चाहत्याला दिला आहे. दरम्यान हेमांगीची ही पोस्ट सध्या चांगली व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करतानाही दिसत आहेत.