अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगीने डान्स करतानाचा आणखी एक धमाल व्हिडीओ शेअर केला आहे. सध्या तिच्या या व्हिडीओची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे.
हेमांगीने आजवर विविधरंगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिकली आहेत. हेमांगीने मालिका, सिनेमा तसचं नाटकांच्या माध्यमातून तिचं अभिनय कौशल्य दाखवत स्वत: ओळख निर्माण केली आहे. नुकतंच हेमांगीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत हेमांगी ही चक्क अभिनेता गोविंदाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. ‘आप के आ जाने से,’ असे या गाण्याचे बोल आहेत. यात तिने अगदी हुबेहुब गोविंदाप्रमाणे कपडे परिधान केले असून ती त्यांच्या स्टाईलप्रमाणे नाचताना दिसत आहे. या व्हिडीओला कॅप्शन देताना तिने ‘ऑन पब्लिक डिमांड’ असे म्हटले आहे.
हेही वाचा : ‘इत्ती सी हसी, इत्ती सी खुशी’, परी आणि शिव ठाकरेचा ‘क्यूट’ व्हिडीओ पाहिलात का?
त्यानंतर तिने पुढे ‘आणि मलाही बहाणा हवा होता’, असे सांगत हा व्हिडीओ शेअर केला आहे. विशेष म्हणजे तिने हा व्हिडीओ गोविंदा यांनाही टॅग केला आहे. तिचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर अनेक जण लाईक्स आणि कमेंट्स करताना दिसत आहे.
तिने हा व्हिडीओ शेअर केल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्स केल्या आहेत. यातील एका नेटकऱ्याने ‘ताई एक नंबर’ अशी कमेंट केली आहे. तर एकाने ‘छान आहे पण नको मराठीच बरं आपलं’ असे म्हटले आहे. तर एकाने ‘नीलमची आठवण करुन दिली’, अशी कमेंट केली आहे. त्यासोबत काहींनी ‘खूप छान’, ‘खतरनाक’, ‘जबरदस्त’ अशाही कमेंट्स केल्या आहेत.