मराठी अभिनेत्री आणि नृत्यांगना म्हणून हेमांगी कवी-धुमाळला ओळखले जाते. हेमांगी ही कायमच तिची मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. सध्या हेमांगी कवी ही ‘जन्मवारी’ या नाटकामध्ये व्यस्त आहे. या नाटकानिमित्त तिने अभिनेता जितेंद्र जोशीचे आभार मानले आहेत.
हेमांगी कवी ही जन्मवारी या नाटकात मंजिरी हे पात्र साकारत आहे. नुकतंच हेमांगीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत जितेंद्र जोशी हा काही ओळी बोलताना दिसत आहे. त्याचे तिने कौतुक केले आहे.
आणखी वाचा : “मला अमेय खोपकरांनी फोनवरुन धमकी दिली”, प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाचा गौप्यस्फोट, म्हणाले “मी कुशलला…”
हेमांगी कवीची पोस्ट
तुझ्या छानशा आवाजाने नाटकाची सुरवात होते. नाट्यगृहाच्या त्या अंधारात तु तुझ्या आवाजाने प्रेक्षकांना एका वेगळ्याच दुनियेत घेऊन जातोस. तुझ्या बोलण्यात आणि आवाजात वेगळीच जादू आहे जी आम्हां कलाकारांना ही विंगेत प्रवेशासाठी उभे असताना मंत्रमुग्ध करते! तुझ्या आवाजात संतांचा अभंग आहे, नदीचा शांत प्रवाह आहे, बासरीतली सुंदर कंपनं आहेत! डोळे बंद करून ऐकलं की वाटतं आपला आतला आवाज आपल्याशी बोलतोय! आम्ही धान्यस्त होतो आणि Correct note ला नाटक सुरू होतं!
तु तुझा आवाज जन्मवारीच्या announcement साठी दिल्याबद्दल तुझे खूप खूप आभार आणि धन्यवाद! जीतू!
आणि ‘गोदवरी’ चित्रपटाला National Award (Best Direction) मिळालं त्यासाठी तुझे आणि निखिलचे मनःपूर्वक अभिनंदन!, असे हेमांगीने म्हटले आहे.
आणखी वाचा : Video : सई ताम्हणकरने मुंबईत खरेदी केलं हक्काचं घर, जुन्या घराला ‘गुडबाय’ करताना म्हणाली “भूतकाळातील…”
दरम्यान ‘जन्मवारी’ हे दोन अंकी व्यावसायिक नाटक आहे. हर्षदा बोरकर यांनी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. यात हेमांगी कवी आणि शर्वरी कुलकर्णी या दोघी प्रमुख भूमिकेत झळकत आहे.