अभिनेत्री हेमांगी कवी तिच्या विविध चित्रपटांसाठी, मालिकांसाठी आणि नाटकांसाठी ओळखली जाते. सध्या तिचं जन्मवारी हे नाटक चर्चेत आहे. त्याचप्रमाणे तिने विविध मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. आज महिला दिन आहे. त्यानिमित्त एक पोस्ट हेमांगी कवीने केली आहे. हेमांगीने एक भावस्पर्शी कविता पोस्ट केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय म्हटलं आहे हेमांगी कवीने?

Society की सोच से वो बाहर निकलती रहें
पिछड़ेपन के सीने पर सेंडल पहन के टहलती रहें
कमज़ोर बनाए जो आँसू ना आँखो से बहे
ख़ुद को बचाने के लिए वो लड़कों को भईया ना कहे
Scooty नहीं बाइक पे भी उनका अधिकार हो
Open jeep पर denim पहन के वो भी सवार हो
हर मोड़ पर उसको क्यों आज़माने हो
अब्बे पहनावे से perception क्यों बनाते हो
कॉल center से job कर के आती है
सुबह किसी धंधे से नहीं
बराबरी करो तो सोच में करो
सिर्फ़ कंधे से नहीं …
उनको अबला कह के ना वीक करो
कपड़े ठीक हैं उनके तुम नज़रें ठीक करो
तुम्हारी अय्याशी का वो बिछौना नहीं है
गुडियाँ गुडियाँ है, तुम्हारा खिलौना नहीं है ..

परीतोष त्रिपाठी (Tv के मामाजी)

ही कविता हेमांगी कवीने आज पोस्ट केली आहे. परितोश त्रिपाठी यांनी शुटिंगच्या दरम्यान ही कविता म्हटली आणि माझे डोळे भरुन आले. या कवितेत मला जे म्हणायचं होतं अगदी त्याच भावना व्यक्त होत आहेत. मला गेल्या काही दिवसांपासून हे बोलायचं होतं, जोरात ओराडयचं होतं. काही लोक महिलांंच्या प्रगतीचं म्हणावं तितकं कौतुक करत नाही. महिलांनी किती प्रगती केली? त्या यशाच्या शिखरावर कशा पोहचल्या हे काहीही बोलत नाही. उलट तिने कपडे काय घातले? असेच कपडे का घातले? यावरच भाष्य करतात. उगाचच महिलांना जज करतात. त्यांच्यावर शेरेबाजी करतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून महिलांना संस्कृती आणि सभ्यता शिकवत असतात. ज्याद्वारे पुन्हा एकदा महिलांनी गुलामीच्या मानसिकतेत जावं, कमकुवत झालं पाहिजे असं त्यांना वाटत असतं.

अशा मानसिकतेचे लोक आपण महिला कोण आहोत? काय आहोत? याचा विचार करायला लावतात. अशा लोकांमध्ये परितोष त्रिपाठींसारखेही लोक आहेत. जे लोक आम्हाला नवी उमेद देतात. तसंच आम्हाला उत्तर मिळतं की आपण महिला कोण आहोत आणि काय आहोत? परितोष त्रिपाठी यांचे आभार असं म्हणत हेमांगी कवीने तिचं म्हणणं मांडलं आहे.