अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. काही दिवसांपूर्वी हेमांगी कवीही परदेशात फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले. नुकतंच तिने भारतात काढलेले फोटो आणि परदेशात काढलेले फोटो याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.
हेमांगी कवी ही फेसबुकवर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते. नुकतंच हेमांगी ही तिच्या कामातून वेळ काढत न्यूयॉर्कला फिरण्यासाठी गेली होती. यावेळी तिने तिचे अनेक फोटो फेसबुकवर पोस्ट केले होते. त्यासोबत तिने काही व्हिडीओ देखील शेअर केले होते. या व्हिडीओमुळे काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले होते. नुकतंच तिने या सर्व ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.
आणखी वाचा : Video : मुंबईत पत्नीसह मनसोक्त फिरताना दिसला प्रसिद्ध क्रिकेटपटू, तुम्हाला ओळखता येतंय का?
तिने फेसबुकवर न्यूयॉर्कमधील काही निवडक फोटो पोस्ट केले आहेत. यात ती म्हणाली, “बाहेरच्या देशांमध्ये काढलेले फोटो जास्त क्लिअर आणि क्लीन येतात. आपल्या आणि आपल्या मोबाईल कॅमेरामध्ये Pollution चा थर नसावा म्हणून असेल का? त.टी : सहज एक observation आहे, कुठला महान शोध लावल्याच दावा अध्यक्ष करत नाहीयेत याची मंडळाने नोंद घ्यावी. आपल्या देशातल्या pollution ला मी ही कारणीभूत आहे याची मला जाणिव आहे. तेव्हा नमस्कार.”
आणखी वाचा : “दिघे साहेबांची गोष्ट खोटी…” प्रसाद ओकचे ‘ते’ वक्तव्य चर्चेत
आणखी वाचा : “आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाही”, अभिनेत्री हेमांगी कवीची पोस्ट व्हायरल
दरम्यान तिच्या या फोटोवर एका नेटकऱ्याने भन्नाट कमेंट केली आहे. “Apple मधुन काढशील तर आपल्याकडेही छान येतात. सगळ्यात महत्त्वाचं कॅमेरा क्वालिटी मॅटर करते. अजून महत्त्वाचं तू जर बाहेर म्हणजे घराबाहेर फोटो काढत असशील स्वच्छ प्रकाशात तर कधीपण छान येतात फोटोज. हे माझं वैयक्तिक मत. तुझं वैयक्तिक मत तुझं आहे. माझं ते माझं आहे. माझं ते माझं आणि माझं तेही तुझं असं माझं म्हणणं अजिबात नाहीये”, अशी कमेंट त्या नेटकऱ्याने केली आहे. त्यावर ‘मी हे photos one plus मधून काढले आहेत’, असे हेमांगी कवीने म्हटले.
दरम्यान हेमांगी कवीची भूमिका असलेला तमाशा लाईव्ह हा चित्रपट गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने ३५ पेक्षा अधिक भूमिका साकारल्या आहे. या चित्रपटात तिने अनेक गाणीही गायली आहेत. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांनी फार कमी प्रतिसाद दिला होता.