अभिनेत्री आणि नृत्यांगना हेमांगी कवी धुमाळ हे नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. हेमांगी अनेकदा सोशल मीडियावर तिचे मत बिनधास्तपणे मांडताना दिसते. हेमांगी ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती नेहमी तिचे अनेक फोटो आणि धमाल व्हिडीओ शेअर करत चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसते. नुकतंच हेमांगीने तिच्या लग्नाच्या वाढदिवस साजरा केला. या वाढदिवसानिमित्त तिने एक सुंदर पोस्ट लिहिली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल झाली आहे.

हेमांगी कवीची पोस्ट

pune rto
“पुणेकर फक्त एकाच गोष्टीला घाबरतात, बाकी कोणालाच नाही!” पण कोणती आहे ती गोष्ट, पाहा Viral Video
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
What Anna Hajare Said?
Anna Hazare Emotional : अरविंद केजरीवाल यांच्या पराभवानंतर अण्णा हजारे रडले; “तुमच्यावर इतकं प्रेम केलं, पण..”
Naga Chaitanya on divorce from Samantha Why am I treated like a criminal
“समोरच्या व्यक्तीचा खूप…”, नागा चैतन्यचे दुसऱ्या लग्नानंतर समांथाबद्दल वक्तव्य; म्हणाला, “नातं तोडण्यापूर्वी मी…”
pandit hridaynath mangeshkar open up about sister and singer lata mangeshkar
दीदी आपल्यातून गेलेली नाही… पं. हृदयनाथ मंगेशकर यांची भावना
chhaava movie marathi writer kshitij patwardhan writes aaya re toofan song
मराठमोळ्या लेखकाने लिहिलंय ‘छावा’ सिनेमाचं गाणं! ए आर रेहमानसह पहिल्यांदाच एकत्र काम; म्हणाला, “शब्दरूपी सेवा…”
Santosh Juvekar
“जर माझं प्रेम असेल…”, अभिनेता संतोष जुवेकरला ‘अशी’ पाहिजे आयुष्याची जोडीदार; म्हणाला…
Milind Gawali
“कलाकारांनी एकतर लग्नच करू नये…”, मिलिंद गवळी असं का म्हणाले?

“लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा! या वर्षांपासून आपल्या लग्नाला किती वर्षे झाली बोलून वर्ष मोजायची नाहीत तर प्रत्येक क्षण जगायचा! एकमेकांना सहन करत आलो वगैरे तर मुळीच म्हणणार नाही, कारण आपल्याला माहितेय आपण कसे आहोत आणि काय आहोत एकमेकांसाठी आणि हे माहीत असणंच जास्त महत्वाचं आहे.” असेही हेमांगी कवी म्हणाली.

“आपल्या संसाराच्या सुरुवातीच्या काळात माझं चिडणं तुझं कमालीचं शांत असणं, मी अति romantic तू unromantic असणं, मी अति practical तू तेवढाच emotional असणं, मी चेंगुस तू खर्चिक असणं. इतक्या वर्षाच्या सहवासमुळे आपल्यातली ही विसंगती सुसंगतीत बदल्याचं श्रेय आपल्या दोघांचं! कुठल्याही परिस्थितीत एकमेकांची साथ सोडायची नाही हे इतक्या वर्षात आपल्याला जमलंय, या पुढे ही जमवू तेवढा समंजसपणा दोघांना ही लाभो!” असेही तिने म्हटले.

अभिनेत्री हेमांगी कवीचा गोविंदाच्या गाण्यावर भन्नाट डान्स, नेटकरी म्हणतात, “छान आहे पण…”

“आतापर्यंत आपल्या दोघांच्याही आयुष्यात मोहाचे क्षण आले असतील, पुढे ही येतील पण तरीही त्या उपर जाऊन आपण एकमेकांना निवडलंय आणि निवडू कुठल्याही आसक्ती शिवाय यातच आपल्या प्रेमाचं, संसाराचं यश आहे. एकमेकांना जिंकल्याचं प्रतीक आहे. एकमेकांशिवाय राहू शकत नाही ते आता… एकमेकांना सोडू शकत नाही दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा! भांडत राहू, वाईट परिस्थितीशी झगडत राहू, आनंदी राहू, समाधानी राहू!,” अशी पोस्ट हेमांगी कवीने शेअर केली आहे. हेमांगी कवीची ही पोस्ट प्रचंड चर्चेत आहे.

Story img Loader