‘महाराष्ट्राची क्रश’ अशी ओळख असलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे ऋता दुर्गुळे. ‘दुर्वा’ मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलेल्या ऋताने अल्पावधीतच मनोरंजनसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं. ‘फुलपाखरू’ या मालिकेमुळे लोकप्रियता मिळालेल्या ऋताचा आज वाढदिवस आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिग्दर्शक रवी जाधव यांनीही ऋताला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ऋताचे काही फोटो शेअर केले आहेत. फोटोमध्ये ऋता स्कूटरवर बसली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रवी जाधव यांनी “ जलद वेग पकडून स्ट्रॅटोस्फेअरमध्ये धमाका करणं, असं तुझं आयुष्य आहे. हॅल्मेट घाल आणि आयुष्यातील या प्रवासाचा आनंद घे. हॅपी बर्थडे”, असं म्हटलं आहे. रवी जाधव यांनी ऋतासाठी केलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहेत. या पोस्टवर चाहतेही कमेंट करत ऋताला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. रवी जाधव दिग्दर्शित नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टाईमपास ३’ चित्रपटात ऋताने मुख्य भूमिका साकारली होती.

mahant namdevshastri latest news in marathi
“नामदेव शास्त्रींनी माफी मागावी अन्यथा…”, राष्ट्रवादी शरद पवार गटाचा इशारा
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Man gets life sentence for pouring kerosene on wife and setting her on fire
पुणे : पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देणाऱ्या एकाला जन्मठेप
Bollywood singer udit Narayan desires for bharat ratna amid Kissing Scandal, Says He Has No Regret
उदित नारायण यांनी भारतरत्न मिळण्याची इच्छा केली व्यक्त, व्हायरल व्हिडीओबाबत म्हणाले, “मला पश्चाताप झाला नाही”
Delhi Assembly election 2025 Yamuna pollution issue in campaign in Delhi
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात आरोपांची राळ; दिल्लीत यमुनेच्या प्रदूषणाचा मुद्दा केंद्रस्थानी
Siddharth Jadhav
Video : सिद्धार्थ जाधवने ‘आई मला नेसव शालू नवा’ लावणीवर धरला ठेका; ‘तू ही रे माझा मितवा’फेम अभिनेत्याने दिली साथ, पाहा व्हिडीओ
mathadi workers leader narendra patil express view on ajit pawar upset
थोरल्या पवारांचे आभार, अजितदादा मात्र नाराज;माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांचे अनुभव कथन
republic day 2025 26 January Charoli poem sologan quotes in Marathi
Happy Republic Day 2025 : प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रियजनांना पाठवा सुंदर मराठी चारोळ्या, WhatsApp, Facebook वर शेअर करा कविता अन् घोषवाक्ये

हेही वाचा >> Brahmastra Box Office Collection day 3 : ‘ब्रह्मास्त्र’ने जमवला १२५ कोटींचा गल्ला; रणबीर कपूरसाठी ठरला बिग ओपनर

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी ऋता एक आहे. तिचा चाहता वर्गही मोठा आहे. ऋताने आजवर ‘दुर्वा’, ‘फुलपाखरू’, ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून प्रेक्षकांचे मनोरंजन केलं. नाटक, मालिकांमधून प्रेक्षकांवर अभिनयाची छाप पाडणाऱ्या ऋताने ‘अनन्या’ चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. या चित्रपटातील तिची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली.

हेही पाहा >> Photos : सचिन पिळगावकरांच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट; मोनोकिनीतील श्रियाचे फोटो पाहून चाहते अवाक

ऋताने दिग्दर्शक प्रतीक शाहशी १८ मे २०२२ रोजी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली. ऋता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायाला मिळतं. वैयक्तिक आयुष्य आणि आगामी प्रोजेक्ट्सबद्दल ती चाहत्यांना माहिती देत असते.

Story img Loader