छोट्या पडद्यावरील ‘फुलपाखरु’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून हृता दुर्गुळेला ओळखलं जाते. गेल्या काही दिवसांपासून हृता ही तिच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत होती. अभिनेत्री ऋता दुर्गुळे आणि तिचा प्रियकर प्रतीक शाह यांचा साखरपुडा मोठ्या थाटात पार पडला. या साखरपुड्याला अनेक कलाकारांनी हजेरी लावली. दरम्यान नुकतच हृताने साखरपुड्यानंतर प्रतीकसोबतचा फोटो शेअर करत एक रोमँटिक पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

साखरपुडा झाल्यानंतर दोन दिवसांनी प्रतीक शाहाचा वाढदिवस होता. या निमित्ताने हृताने खास पोस्ट लिहिली आहे. याच पोस्टद्वारे तिने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत. हृताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ही पोस्ट शेअर केली आहे. यात हृता म्हणाली, “वाढदिवसाच्या शुभेच्छा मिस्टर शाह…, माझ्याकडून तुला खूप प्रेम, आनंद, सकारात्मकता आणि नशीब. तू जिथं जाशील त्या ठिकाणी तुझ्या चेहऱ्यावरचे तेज असेच राहावे. तुझ्या चेहऱ्यावरचे हसू नेहमी असेच असावे. प्रेम आणि फक्त तुझ्यासाठी प्रेम,” असे तिने यात म्हटले आहे.

Kapil Sharma wanted to beat KRK honey singh
“कपिल शर्मा अभिनेत्याला मारायला गेलेला, त्याच्या दुबईतील घरात काच फोडली, हनी सिंगने त्याचे केस ओढले”
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Dr. Manmohan Singh passes away at 92
Dr. Manmohan Singh Passes Away : देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, आजचे शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर आज होणार अंत्यसंस्कार!
PM Narendra Modi and Manmohan singh
Dr. Manmohan Singh Passed away: डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
tharla tar mag arjun confess love for sayali at bus stand
ठरलं तर मग : अखेर तो क्षण आला! एसटी स्टँडवर जाहीर घोषणा करत अर्जुनने दिली प्रेमाची कबुली; म्हणाला, “मिसेस सायली…”
akshay kelkar girlfriend sadhana kakatkar
१० वर्षे नातं ठेवलं गुपित; अखेर दिली प्रेमाची कबुली! अक्षय केळकरची ‘रमा’ आहे तरी कोण? पोस्ट शेअर करत म्हणाली, “त्याने वचन…”
zakir hussain account first post after demise
झाकीर हुसैन यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर कुटुंबियांकडून पोस्ट; ‘तो’ खास फोटो शेअर करत लिहिलं…

हृताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन ही रोमँटिक पोस्ट शेअर करत प्रतिकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. त्यानंतर तिची ही पहिली पोस्ट आहे. तिच्या या पोस्टवर अनेकांना लाईक्स आणि कमेंट केल्या आहे. विशेष म्हणजे प्रतिकवरही शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे.

Happily Engaged : पाहा हृता दुर्गुळेच्या साखरपुड्याचे खास फोटो

हृताने ‘फुलपाखरू’ या मालिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. ती नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक अशी तिची ओळख आहे. हृता सध्या ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत दिपूची भूमिका साकारताना दिसत आहे. तर प्रतीकने काही मालिकांचे दिग्दर्शन केले आहे. त्याने बेहद २, बहू बेगम, कुछ रंग प्यार के ऐसे भी, तेरी मेरी एक जिंदड़ी मालिकांसाठी काम केले आहे.

Story img Loader