‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे अभिनेता ओंकार भोजने प्रसिद्धीच्या झोतात आला. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम सोडल्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘फु बाई फु’ या कार्यक्रमात दिसला. मालिकांप्रमाणे तो आता चित्रपटातही दिसत आहे. सध्या तो ‘कलावती’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. अभिनेत्री ईशा केसकरने त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओंकार भोजने व ईशा केसकर नुकतेच ‘सरला एक कोटी’ चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटातील दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस पडली होती. ईशा केसकर सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. तिने नुकतेच इन्स्टाग्राम अकाउंटवर ओंकार भोजनेचा फोटो स्टोरीमध्ये शेअर केला आहे. ज्यात ती असं म्हणते, “हॅपी भोजने डे, असाच प्रेमळ राहा आणि चमकत राहा.” अशा शब्दात तिने शुभेच्या दिल्या आहेत.

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील एंट्रीबद्दल पृथ्वीक प्रतापचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “मला नकार…”

‘सरला एक कोटी’ या चित्रपटात ओंकार भोजने, ईशा केसरकर मुख्य भूमिका साकारताना दिसले होते. चित्रपटाची कथा एका सत्य घटनेवर आधारित होती. या चित्रपटाचं दिग्दर्शन नितीन सिंधु विजय सुपेकर यांनी केलं होतं.

दरम्यान ओंकार भोजने हा लवकरच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव हे ‘कलावती’ चित्रपटात दिसणार आहे. संजय जाधव हे या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन करत आहेत. तब्बल ४ वर्षांनी संजय जाधव यांचा चित्रपट मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. या चित्रपटात अमृता खानविलकर, संजय नार्वेकर, तेजस्विनी लोणारी, हरिश दुधाडे हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.