सध्या महाराष्ट्र दोन कारणांनी चर्चेत आहे. एक म्हणजे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण आणि दुसरं म्हणजे जवळपास दोन वर्षांनी पुन्हा सुरु झालेली वारकऱ्यांची वारी. सध्या महाराष्ट्रातील वातावरण या वारीमुळे भक्तमय झालंय आणि अनेक माणसं मोठ्या संख्येनं वारीमध्ये सहभागी होताना दिसत आहे. यात अगदी मराठी कलाकारांचा देखील समावेश आहे. प्रसिद्ध अभिनेत्री कश्मिरा कुलकर्णी देखील यंदा वारीला गेली असून तिथे ती वारकऱ्यांची सेवा करत आहे.

कश्मिरानं नुकतंच तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा आहे. तिने हा व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “पंढरीची वारी, वारी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक लोकजीवनातील एक अत्युच्च आणि सर्वव्यापी आनंद सोहळा आहे महाराष्ट्रीय जनविश्वाच्या लोकभावाची एक सांस्कृतिक अभिव्यक्ती म्हणजेच पंढरीची वारी होय इथे माणसांमधला देव पाहता येतो माणुसकी, सेवाभाव, भक्ती आणि अगाध असा अध्यात्माचा महिमा अनुभवता येतो. अशाच एका वारीचा अनुभव”

आणखी वाचा- ‘आई कुठे काय करते’मधील अरुंधतीने सोडली मालिका? चर्चांना उधाण

कश्मिरानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये तिच्या संस्थेबद्दल माहिती दिली आहे. तसेच या व्हिडीओमध्ये ती कधी वारकऱ्यांना आरोग्य सुविधा पुरवताना, कधी त्यांना जेवण देताना तर कधी वारकऱ्यांचा पायांना मालिश करून देताना दिसत आहे. विशेष म्हणजे हे सर्व करत असताना ती या भक्तीमय वातावरणाशी एकरुप झालेली पाहायला मिळत आहे.

कश्मिरानं २०१९ साली ‘शुचिकृत्य’ या फाउंडेशनची स्थापना केली आहे. या फाउंडेशन अंतर्गत पालखी मार्गात वारकऱ्यांना औषधं, अन्नदान, मेडिकल कॅम्प, पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जातात. गेल्या काही वर्षांपासून ती असे विविध उपक्रम राबवताना दिसते. पूरग्रस्त, आदिवासी भागातील शाळेतील मुलांना कपडे, अन्नधान्य वाटप असे विविध उपक्रम या संस्थेतून राबविले जातात.

Story img Loader