अभिनेत्री केतकी चितळे ही सातत्याने चर्चेत असते. विविध वादग्रस्त कारणांमुळे ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. समाजातील अनेक गोष्टींवर केतकी तिचं मत अगदी परखडपणे मांडताना दिसते. यावरुन तिला ट्रोलही केले जाते. नुकतंच केतकी चितळेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या एका वक्तव्यावर टीका केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“आपल्या देशाचे दोन राष्ट्रपिता आहेत. महात्मा गांधी हे जुन्या भारताचे तर नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे राष्ट्रपिता आहेत”, असे मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केले. अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे मंगळवारी आयोजित अभिरूप न्यायालयात अमृता फडणवीस यांनी उत्तरे दिली. अमृता फडणवीसांनी केलेले हे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. त्यावर आता केतकी चितळेने पोस्ट शेअर केली आहे.
आणखी वाचा : Amruta Fadnavis on Narendra Modi : गांधी जुन्या तर मोदी नव्या भारताचे राष्ट्रपिता!

केतकी चितळेने नुकतंच इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने अमृता फडणवीसांवर अप्रत्यक्षरित्या टीका केली आहे. “जुने विरुद्ध नवे गुरु आणि जुने विरुद्ध नवीन राष्ट्रपिता हा वाद आता जुना होत चालला आहे. भारत देश हा प्रत्येक सेकंदाला बदलतोय आणि आता आपण स्वत:लाही बदलायची वेळी आली आहे. त्यामुळे आता ३ हजार वर्षे प्राचीन गोष्टींची व्याख्या १०० वर्षे झाली आहेत, हे सत्यही आपण स्वीकारायला हवं”, असा टोला तिने अमृता फडणवीसांना लगावला आहे. जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय  जागो मेरे देश, असेही तिने यात म्हटले आहे.

आणखी वाचा : “मी तुमच्यासाठी घटिया औरत…” केतकी चितळेने नेटकऱ्याला सुनावले खडेबोल

दरम्यान केतकी चितळेची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तसेच तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

‘आंबट गोड’ मालिकेतून केतकी घराघरात पोहोचली. तिने अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. काही महिन्यांपूर्वी केतकीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यामुळे तिला तुरुंगातही जावं लागलं होतं.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ketaki chitale comment on amruta fadnavis said mahatma gandhi is old and modi is the father of new india nrp