सातत्याने विविध वादग्रस्त कारणांमुळे चर्चेत राहिलेली अभिनेत्री म्हणून केतकी चितळेला ओळखले जाते. ती कायमच तिच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असते. यामुळे अनेकदा ती वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. सध्या संपूर्ण देशभरात श्रद्धा वालकर हत्या प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. यावर अनेक कलाकार त्यांचे मत मांडताना दिसत आहे. नुकतंच अभिनेत्री केतकी चितळेने याबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. पण यानंतर तिला एका नेटकऱ्याने घटिया औरत असे म्हटले आहे. त्यावर तिने प्रतिक्रिया दिली आहे.

केतकी चितळेने श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. त्यावर ती म्हणाली, “मेरा अब्दुल ऐसा नहीं. बरोबर आहे. कारण आप मेलं, जग बुडालं. पण ३५ तुकडे होताना, गळा दाबला जाताना तरी कुठे तरी पश्चात्ताप होत असेल ना? कुटुंबियांची आता काय मानसिक स्थिती असेल याचा तर विचार केल्यास अंगावर काटा येतोय. मुलींनो, तुम्ही शेवटचा श्वास घेताना डोळे उघडून पुन्हा (या वेळी कायमचे) मिटणार आहात? का आता तरी निद्रा मोडणार आहात?!!!? #जागोमेरेदेश” असे तिने म्हटले होते.
आणखी वाचा : “मेरा अब्दुल ऐसा…” श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट चर्चेत

ketaki-chitale-post
केतकी चितळे पोस्ट

तिच्या या पोस्टनंतर अनेकांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. यात एका इरफान शेख नावाच्या व्यक्तीने तिला मेसेज केला आहे. याचे काही स्क्रिनशॉट तिने इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. यात त्या व्यक्तीचा मेसेज आणि केतकीने त्यावर दिलेले उत्तर पाहायला मिळत आहे. इरफानने तिला ‘घटिया औरत’ म्हटल्याने तिने संताप व्यक्त केला आहे.

केतकीने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटमध्ये इरफान नावाच्या व्यक्तीने तिला मेसेज केला आहे. “केतकी तुम एक नंबरी की घटिया औरत हो”, असे तो म्हणाला. यावर कमेंट करत ती म्हणाली, “काही असे सांगा जे मी याआधीही वाचलेले नाही.” त्यावर तो म्हणाला “तू जे आहेस तेच बोलणार ना.” त्यावर तिने त्याला स्पष्टपणे उत्तर दिले आहे.

आणखी वाचा : “मला लाखो रुपये दिले तरीही…” रोहितला इन्स्टाग्रामवरुन अनफॉलो करण्याबद्दल रुचिरा जाधव स्पष्टच बोलली

केतकीने तिला ट्रोल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला चांगलेच सुनावले आहे. त्याने त्याच्या मेसेजमध्ये व्याकरणाची चूक केल्याने तिने आधी त्याला ती चूक दाखवून दिली आहे. “घटिया आणि औरत या दोन शब्दांमध्ये स्पेस टाकायचा राहून गेला आहे तुमचा… तुम्ही मला एखाद्या ५ वर्षांच्या मुलाप्रमाणे ट्रोल करत आहात. अरे मी तर विसरलेच की तुमच्यासारखी लोकं शाळेत नाही मदरशांमध्ये जातात, जिथे व्याकरण थोडी ना शिकवलं जातं”, असे केतकी चितळे म्हणाली.

ketaki chitale insta story
केतकी चितळेची इन्स्टाग्राम स्टोरी

त्यापुढे ती म्हणाली, “मी तुमच्यासाठी घटिया औरत नक्कीच आहे. मला याचा गर्व आहे की मी तुमच्यासाठी घटिया औरत आहे. कारण तुम्ही जेव्हा मला हे बोलता तेव्हा तुमचा सनातनी द्वेष स्पष्ट दिसतो.” तिने या संभाषणाचा एक स्क्रिनशॉट इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केला आहे. त्याबरोबर तिने आणखी एक स्टोरीही शेअर केली आहे.

ketaki chitale instagram story
केतकी चितळेची इन्स्टाग्राम स्टोरी

आणखी वाचा : शिवसेनेचा पदाधिकारी, ८ वर्षांचे रिलेशन आणि घटस्फोट, जाणून घ्या अपूर्वा नेमळेकरच्या पूर्वाश्रमीच्या पतीबद्दल…

“मला एखाद्या शेखने ‘घटिया औरत’ म्हटले याचा मला अभिमान आहे, यातून हेच सिद्ध होते की ते सनातनी महिलांचा किती द्वेष करतात. #Girls_Wakeup हे लोकं शेवटी आपल्याला घटिया म्हणत राहणार” असेही तिने यात म्हटले आहे. दरम्यान केतकी चितळेची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करताना दिसत आहे. तसेच तिची ही पोस्ट सध्या चर्चेत असल्याचेही पाहायला मिळत आहे.

Story img Loader